आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलादिनी मुलींनी पाहिले ठाण्याचे काम; ऑनलाइन दाखल केला गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्याचा कारभार शिवाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पाहिला. मुलींनी पोलिसांच्या सर्व भूमिका वठवत गुन्हा दाखल करून घेतला. छाया : योगेश गौतम - Divya Marathi
परभणीच्या नवा मोंढा पोलिस ठाण्याचा कारभार शिवाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी पाहिला. मुलींनी पोलिसांच्या सर्व भूमिका वठवत गुन्हा दाखल करून घेतला. छाया : योगेश गौतम
परभणी - जागतिक महिला दिनानिमित्त शहरातील नवा मोंढा पोलिस ठाण्यात स्मार्ट पोलिस या संकल्पनेतून विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना बुधवारी (दि.आठ) पोलिस ठाण्याचे दिवसभराचे कामकाज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. महिला-मुलींनी ही जबाबदारी लीलया पार पाडून एका वेगळ्या कामकाजाच्या अनुभवाची शिदोरी सोबत घेतली. विशेष म्हणजे एक गुन्हा त्यांनी ऑनलाइन पद्धतीने दाखल केला.  

पोलिस अधीक्षक नियती ठाकर व अतिरिक्त पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवाजी विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींना आमंत्रित करून दुपारी दोन ते चार या वेळेत त्यांना कामकाज पाहण्याची संधी देण्यात आली. भविष्यामध्ये या मुली वकील होणार असून त्यांना पोलिसांना दैनंदिन कामकाजास कशा प्रकारे सामोरे जावे लागते, तक्रारदारांनी सांगितलेली हकिगत व त्याच्यावर झालेला अन्याय हा कोणत्या कायद्यानुसार व कोणत्या कलमात बसू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव घेता यावा, पोलिसांशी जवळीक निर्माण व्हावी या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला. यात पोलिस निरीक्षक म्हणून हर्षा सूर्यवंशी, सहायक निरीक्षक म्हणून कोमल देवरे, फौजदार म्हणून निदा सय्यद यांनी जबाबदारी सांभाळली. ठाणे अमलदार म्हणून पूजा घोडके, भोपळे, अन्सारी अर्शिया, किरण देशमुख, सुरेखा जोंधळे, कीर्ती गव्हाणे यांनी ठाण्यातील विविध पदांवर काम पाहिले. बिट मार्शल म्हणून शेख अमिना, श्वेता कोरडे, पूनम कदम, राधिका चौधरी यांच्यासह शेख लईबा, सायली गव्हाणे, मयूरी शिरसाठ, किरण देशमुख, छाया शिंदे, ललिता पतंगे, सुमन उफाडे, पूजा भालेराव आदींनी कामे पाहिली.
 
दुचाकी चोरीचा गुन्हा  
विद्यार्थिनींच्या उपक्रमादरम्यान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अर्जुन अवचार यांची मोटरसायकल जुन्या आरटीओ कार्यालय परिसरातून चोरीस गेल्याची तक्रार आली असता या मुलींनी अतिशय चांगल्या पद्धतीने तक्रारदाराचे म्हणणे ऐकून घेऊन तक्रारीची नोंदणी सीसीटीएन ऑनलाइन प्रणालीद्वारे करून गुन्हा दाखल केला.
 
पुढील स्लाईडवर वाचा, कामकाजाबद्दल केला सत्कार...
 
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
बातम्या आणखी आहेत...