आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मध्यवर्ती गणेश मंडळात युवकांनी उस्मानाबाद शहरात माणुसकीची भिंत तयार केली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- समतानगर येथे समता मध्यवर्ती गणेश मंडळातील युवकांनी पुढाकार घेऊन माणुसकीची भिंत तयार केली आहे. याच्या माध्यमातून कोणतीही वस्तू दान देता येणार असून या उपक्रमाची सुरुवात महाशिवरात्रीपासून होणार आहे. भिंतीवर वस्तू ठेवण्यासाठी हँगरही लावण्यात आले आहेत. 
  
वापरलेले कपडे, बूट, चपला, पिशव्या व अन्य साहित्य सातत्याने विकत घेण्याची अनेकांची हौस असते. यामुळे जुन्या साहित्याचा प्रश्न निर्माण होतो. असे साहित्य दान देण्याची प्रत्येकाची इच्छा असते. मात्र, दान कुणाला द्यावे हेच लक्षात येत नाही. यामुळे साहित्य, वस्तू घरातच कुजत पडतात. ही परिस्थिती ओळखून येथील समता मध्यवर्ती मंडळाच्या युवकांनी ‘माणुसकीची भिंत’ ही संकल्पना प्रत्यक्षात आणली आहे.
 
 यासाठी प्रत्येक युवकाने पुढाकार घेऊन समतानगर येथील एका दुकानाच्या भिंतीला ‘माणुसकीच्या भिंती’चे स्वरूप दिले आहे. यासाठी आकर्षक रंगरंगोटी करण्यात आली आहे. तसेच कपडे व अन्य साहित्य ठेवण्यासाठी हँगरचीही व्यवस्था भिंतीसाठी करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी संदीप साळुंके, अॅड. अमर लाव्हरे, वैभर मोरे, सुजित साळुंके यांनी पुढाकार घेतला आहे.   
 
बातम्या आणखी आहेत...