आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जि.प.ची रणधुमाळी: अखेरच्या दिवशी इच्छुकांची जत्रा, ऐनवेळी कोलांटउड्या, शक्तिप्रदर्शनासह उमेदवारी अर्ज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- जिल्हा परिषदेच्या ५४ तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी बुधवारी (दि.एक) मोठे शक्तिप्रदर्शन करीत इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपसह शिवसेनेने हजारो कार्यकर्त्यांच्या सहभागाने अर्ज दाखल केले. अखेरच्या दिवशी सर्वच पक्षांचा जोर राहिल्याने प्रत्येक तहसील कार्यालयाला जणू जत्रेचेच स्वरूप आले होते. 
 
काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप, शिवसेनेने बहुतांश जागी आपले उमेदवार दिले आहेत. भाकप, माकपनेही काही जागांवर उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काँग्रेससोबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काही तुरळक जागांवर युती केली आहे.
 
पाथरीत जि.प.च्या ५ जागांसाठी २२, सेलूत ५ जागांसाठी ४४, पूर्णेत ६ जागांसाठी ६७, सोनपेठमध्ये ३ जागांसाठी २३, गंगाखेडमध्ये ७ जागांसाठी ५५, जिंतुरात १० जागांसाठी ५०  तर मानवतमध्ये चार जागांसाठी ४४ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले. परभणी, पालममध्येही उमेदवारी अर्जांची संख्या अशीच राहिली.

नांदेड- जि.प.च्या ६३ जागांसाठी ८९१ तर पं.स.च्या १२६ जागांसाठी ११५९ अर्ज आले.

लातूर : ५८ जागा, ५१५ अर्ज
लातूर- ५८ गटांसाठी ५१५ तर ११६ गणांसाठी ८२८ अर्ज दाखल झाले. बुधवारी शेवटच्या दिवशी सर्वाधिक अर्ज दाखल झाले. लातूर जिल्हा परिषदेचे ५८ गट आहेत. ४ दिवस ऑनलाइन अर्जासाठी अडचणी येत होत्या. सर्व्हर बंद पडणे, मध्येच एखादे ऑप्शन न उघडणे अशा तक्रारी होत्या. त्यावर मात करून काही जणांनी रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल केले. 

बीड- ६० गटांसाठी ८५० तर १२० गणांसाठी १२०० अर्ज दाखल झाले.

हिंगोली : ११३ इच्छुक
हिंगोली-  जिल्हा परिषदेच्या ५२ तर पंचायत समितीच्या १०४ जागांसाठी बुधवारी ३ वाजेपर्यंत तहसील कार्यालयात दाखल झालेल्या उमेदवारांना कार्यालयात घेऊन दरवाजे बंद केलाे. त्यानंतर सायंकाळी ६ वाजेनंतरही चालूच होते. एकूण ११३, कळमनुरीत १२०, औंढा येथे ८७, सेनगावात ९१ तर वसमत येथे ११९ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याची माहिती प्रशासनाने दिली. 

उस्मानाबाद- ५५ गटांसाठी ६५१ तर ११० गणांसाठी १०१९ अर्ज दाखल झाले.

भाजप प्रदेशाध्यक्ष दानवेंच्या कन्येचा जि.प.साठी अर्ज दाखल
भोकरदन\\जालना
- भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांची ज्येष्ठ कन्या आशा मुकेश पांडे यांना  भोकरदन तालुक्यातील सोयगावदेवी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.  उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी एक फेब्रुवारीला  शेवटच्या वीस मिनिटांत आशा पांडे यांनी कुटुंबासह येऊन तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. दोन दिवसांपासून त्यांना उमेदवारी देणार की नाही  याविषयी तर्क-वितर्क सुरू होते. भाजपच्या अधिकृत उमेदवार आशा मुकेश पांडे यांचा सोयगावदेवी गटातून, तर कुशावर्ता तुकाराम जाधव यांचा तळेगाव गटातून उमेदवारी अर्ज दाखल झाला आहे. जि. प.चे विद्यमान अध्यक्ष तुकाराम जाधव यांचा तळेगाव गट महिलांसाठी राखीव झाल्याने जाधव यांच्या पत्नी कुशावर्ता तुकाराम जाधव यांना पक्षाने तळेगाव गटातून उमेदवारी दिली. दरम्यान, जिल्ह्यातील ५६ गटांसाठी ४१५ तर ११२ गणांसाठी ७८५ अर्ज दाखल झाले.
बातम्या आणखी आहेत...