आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्न ऐरणीवर : कुपोषित मुलीला घेऊन पालक पसार, आरोग्य विभागाने पालावरून आणले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड   - माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील कुपोषित मुलीला गुरुवारी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रात्रीच पालकांनी मुलीला घेऊन जिल्हा रुग्णालयातून पलायन केले. दरम्यान, शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाच्या पथकाने पुन्हा त्या मुलीला व पालकांना शोधून आणून जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. कुपोषणासारख्या प्रश्नावरही पालक जागृत नसून उपचारांसाठी मानसिकता नसल्याचे  यानिमित्ताने समोर आले आहे.   
 
माजलगाव तालुक्यातील फुले पिंपळगाव येथील वीटभट्टीवरील  पालावर भटक्या समाजातील प्रियंका  राजाभाऊ खरात (१८ महिने) ही मुलगी कुपोषित असल्याचा प्रकार गुरुवारी समोर आल्यानंतर आरोग्य  विभागाच्या पथकाने फुलेपिंपळगावात जाऊन  त्या मुलीची पाहणी केली हाेती. डॉ. डी. जे. पारगावकर यांनी या मुलीला जिल्हा रुग्णालयातील एनआरसी कक्षात उपचारासाठी रेफर केले होते. तपासणीत ही मुलगी तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले. पुढील पंधरा दिवस या मुलीवर रुग्णालयातील विशेष कक्षात उपचार होणार होते. मात्र, तत्पूर्वीच कक्षातील परिचारिका व अधिकाऱ्यांची नजर चुकवून गुरुवारी रात्रीच प्रियंकाचे वडील राजाभाऊ खरात  व आई लंका यांनी प्रियंकाला घेऊन जिल्हा  रुग्णालयातून पलायन केले.   
 
वैद्यकीय अधिकारी डॉ. हनुमंत पारखे यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागेश चव्हाण यांना याबाबत माहिती दिली. कुपोषित मुलीला घेऊन पालकच पसार झाल्याने खळबळ उडालीच, शिवाय अधिकारीही हतबल झाले. चव्हाण यांनी पाेलिसांना या प्रकाराची माहिती दिली. शुक्रवारी सकाळी आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुन्हा फुलेपिंपळगाव गाठून राजाभाऊ  खरात राहत असलेल्या पालावर भेट दिली आणि कुपोषित बालिकेला पुन्हा जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले.
 
पाच जणांचा लेखी नकार: कुपोषित बालकांना पंधरा दिवस विशेष कक्षात उपचार देण्यात येतात. परंतु १५ दिवस रुग्णालयात थांबवण्यास अनेकदा पालक तयार नसतात. यासाठी  बालकाच्या आईला आरोग्य विभागाकडून शंभर ते दीडशे रुपये बुडीत मजुरीही देण्यात येते. परंतु पालकांची उपचारांची मानसिकता नसते.  वैद्यकीय सल्ला टाळून सहा महिन्यांत पाच पालक बालकांना  रुग्णालयातून घेऊन गेले आहेत. त्यांच्याकडून रुग्णालयाने याबाबत लेखी घेतले आहे. 
 
अधिकाऱ्यांनी घेतल्या बालिकेच्या कुटुंबीयांच्या भेटी  
प्रियंका खरात पुन्हा  जिल्हा रुग्णालयात दाखल केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. नागेश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉॅ. संदीप सांगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदय साळुंके यांनी रुग्णालयात भेट घेऊन या कुटुंबीयांचे समुपदेशनही केले. 
बातम्या आणखी आहेत...