आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षकानेच केला पीडित मुलीचा गर्भपात; पोलिस निरीक्षकांनी वरिष्ठांना दिला अहवाल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर- सांगलीतील पोलिस अत्याचाराच्या प्रकाराची चर्चा होत असतानाच लातूर जिल्ह्यातही पोलिसांच्या अत्याचाराला बळी पडलेल्याची घटना समोर आली आहे.  पोलिस निरीक्षकाने अल्पवयीन बलात्कार  पीडितेला गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून तिचा गर्भपात केला असून आरोपींविरुद्धचे पुरावे नष्ट केल्याचे उघड झाले आहे. याबाबतचा तसा अहवाल मूळ तपास अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे दिला आहे.  


मुळात कदमच या प्रकरणातील तपास अधिकारी होते. परंतु ते रजेवर गेल्यानंतर मधल्या काळात निरीक्षक पाटील यांनी मुलीचा गर्भपात घडवून आणला. हा प्रकार समजल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कदम यांनी मुळापासून तपास केला. मुलीचा न्यायदंडाधिकाऱ्यासमोर जबाब नोंदवला. या प्रकरणात मुलीचा गर्भपात करून पोलिस निरीक्षक पाटील यांनी डीएनए चाचणी करून आरोपींना अटक करण्याएेवजी जाणीवपूर्वक त्यांना मदत केली. पीडित मुलीवर अन्याय करून आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला. पुरावे नष्ट करणे, आरोपींना वाचवणे या कलमाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करणे योग्य असा स्पष्ट अहवाल पोलिस अधीक्षकांना दिला आहे.

 

पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी हा अहवाल मिळताच पोलिस निरीक्षक पाटील यांच्याकडून देवणी ठाण्याचा पदभार काढून त्यांची लातूरच्या अार्थिक गुन्हे शाखेत बदली केली आहे. मात्र, त्यांच्यावर अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही पोलिस उपाधीक्षकामार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. गेल्या वर्षी दीपावलीमध्ये अरुण राठोड या ऊसतोड मुकादमाने पीडित मुलीच्या आई-वडिलांना तामिळनाडूत ऊस तोडीसाठी नेले होते. त्यावेळी अरुण राठोड आणि ट्रकचालक सुरेश पवार या दोघांची मुलीवर वाईट नजर पडली. ऊसतोडीवरून परत आल्यानंतर ६ एप्रिल २०१७ रोजी अरुण राठोड आणि सुरेश पवार या दोघांनी तिला देवणी तालुक्यातील तळेगावमधून पळवून परभणी जिल्ह्यातील सोनपेठमध्ये ठेवले. दीड महिन्यानंतर ३० मे रोजी मुलीने चोरून वडिलांना फोनवर संपर्क केला आणि ती सोनपेठ येथे असल्याचे सांगितले. त्यांनी तिला तेथे येऊन देवणीला पोलिस ठाण्यात आणले आणि राठोड-पवार विरोधात अपहरण व बलात्काराची तक्रार दिली, परंतु पोलिस निरीक्षक  पाटील यांनी बलात्काराचे कलम लावले नाही. त्याचदरम्यान मुलीने पोट दुखत असल्याचे सांगितल्याने तिच्या पालकांनी तिला रुग्णालयात नेले होते.

 

तपास डीवायएसपींकडे  
निलंगा उपविभागाचे डीवायएसपी गोपाळ रांजणकर यांच्याकडे या प्रकरणाचा तपास गुरुवारी सायंकाळी सोपवण्यात आला आहे. त्यांच्या अहवालानंतर पोलिस निरीक्षक पाटील यांच्यावर या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई होऊ शकते, असे सांगण्यात आले.  

बातम्या आणखी आहेत...