आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महागाईविरोधात काँग्रेसची राज्यात विविध ठिकाणी निदर्शने, ‘मोदी हाय हाय’च्या घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - पेट्रोल व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीबाबत केंद्र शासनाच्या विरोधात जिल्हा काँग्रेसतर्फे रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर वाहन ढकल मोर्चा काढण्यात आला. ‘मोदी हाय हाय’च्या घोषणा देत मोटारसायकली ढकलत कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. उपजिल्हाधिकारी अँड. अनंत गव्हाणे यांना निवेदन देण्यात आले.

टाऊन हॉल मैदानावरून सकाळी 11 च्या सुमारास मोर्चा मार्गस्थ झाला. दीडशे कार्यकर्ते मोटारसायकलसह मोर्चात सहभागी झाले होते. आमदार वैजनाथ शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. व्यंकट बेद्रे, जि. प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, महापौर स्मिता खानापुरे, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पवार, काँॅग्रेस पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते यात सहभागी झाले होते.

अच्छे दिन आयेंगे असे सांगत जनतेची मते घेऊन केंद्रात सत्ताधारी झालेल्या एनडीएने जनतेची दिशाभूल केली आहे. सत्तेवर आल्यापासून महागाई वाढवण्याचेच निर्णय घेतले जात आहेत. जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे आम जनता भरडली जात आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने अर्थिक संकट अधिक घट्ट झाले असून सरकारच्या या धोरणाचा निषेध करण्यात आल्याचे अँड. व्यंकट बेद्रे यांनी सांगितले.

उस्मानाबादेतही दुचाकी ढकलून निषेध : केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आरूढ झाल्यानंतर एका महिन्यातच महागाई प्रचंड वाढली आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत दरवाढ झाली आहे. या दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसने जिल्हाभरात विनाइंधन वाहने चालवून अनोखे आंदोलन केले. महागाईविरोधात राज्यातील काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून प्रत्यक्षात ‘बुरे दिन’ आणणार्‍या भाजपविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरली.
उस्मानाबाद येथे छत्रपती शिवाजी चौकातून फेरीला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनामध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष राजाभाऊ शेरखाने सहभागी झाले होते. उमरगा येथे फेरी काढण्यात आली. काँग्रेस कार्यालयाजवळ सांगता झाली.

सायकलवरून निदर्शने
माजलगाव । कॉँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी केंद्र सरकारच्या निषेधार्थ सायकल फेरी काढून निदर्शने आंदोलन केले. हे आंदोलन तालुकाध्यक्ष नारायण होके यांच्या नेतृत्वाखाली रविवारी करण्यात आले. मोदी सरकारने महागाईचा मुद्दा उपस्थित करुन ‘देश मे अच्छे दिन’ निवडणुकांमध्ये प्रचार केला होता. मात्र सत्तेवर येताच रेल्वे दरवाढ केली. केंद्र शासनाच्या निर्णयाच्या विरोधात महागाई या मागणीसाठी रविवारी कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष नारायण होके यांच्या शहरातून सायकल व दुचाकी फेरी काढली. ही फेरी शहरातील शिवाजी चौक येथून काढण्यात आली.
मोदी सरकारच्या विरोधात तालुका कॉँग्रेस रस्त्यावर
खुलताबाद / मोदी सरकारने केलेल्या रेल्वे व जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीच्या निषेधार्थ खुलताबाद तालुका काँग्रेस शाखेच्या वतीने रविवारी सकाळी शहरातील म्हैसमाळ-फुलंब्री चौकात जोरदार निदश्रने करण्यात आली. तालुकाध्यक्ष जगन्नाथ खोसरे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात महिला पदाधिकार्‍यांचा मोठा सहभाग होता. या वेळी जिल्ह्यातील कॉँग्रसेच पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शोभा खोसरे, शहराध्यक्ष अब्दुल समद टेलर, सरचिटणीस जयश्री शेळके, कन्नड तालुकाध्यक्षा उज्ज्वला सोनवणे, वैजापूर तालुकाध्यक्ष जयमाला वाघ, फुलंब्री तालुकाध्यक्षा आशा जाधव, गंगापूर तालुकाध्यक्ष छायाताई वाघचौरे, पैठण तालुकाध्यक्षा मंगला नवले यांची उपस्थिती होती.
फोटो - खुलताबाद येथील आंदोलनाता फोटो