आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगराध्यक्ष, उपाध्यक्ष निवडणुकीसाठी हालचाली, 11 जुलैला निवडणूक;

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्ह्यातील सात नगरपालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी एस.पी.सिंह यांनी जाहीर केला असून त्यामुळे या पालिकांच्या राजकीय वतरुळात हालचाली गतिमान झाल्या आहेत. सहा महिने या निवडणुका लांबणीवर पडल्याच्या चर्चेला या निवडणूक कार्यक्रमाने पूर्णविराम मिळाला. सोमवारपासूनच या निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. 11 जुलै रोजी या निवडणुका होणार आहेत.
पहिला अडीच वर्षांचा कालावधी 27 जून रोजी पूर्ण झाल्याने जिल्ह्यातील सात पालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांचा कालावधी संपुष्टात आला आहे. पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी या दोन्ही पदांची निवड होणार असल्याने या सातही पालिकांत मागील महिनाभरापासून निवडणुकीची प्रतीक्षा होती. त्यातच ही निवडणूक लांबणीवर पडल्याची चर्चा होती, तरीदेखील गंगाखेडसारख्या पालिकेत राजकीय कुरघोड्या सुरूच होत्या. नगरसेवकदेखील सहलीवर गेले होते. त्यातून गंगाखेडमध्ये तर फोडाफोडीचे राजकारण पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचले. आता निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने या राजकीय हालचालींना गती आली आहे. ज्या पालिकांत स्थानिक पातळीवरच्या तडजोडी होत्या, तेथे या फोडाफोडीच्या राजकारणाला अधिक महत्त्व आले आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्ह्यातील पूर्णा, पाथरी, गंगाखेड, मानवत, सोनपेठ, सेलू व जिंतूर या पालिकांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांसाठी 11 जुलैला विशेष सभेचे आयोजन जिल्हाधिकार्‍यांनी त्या त्या पालिकांत केले असून त्यासाठी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकार्‍यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. सोमवारी व मंगळवारी (दि. सात व आठ) उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. मंगळवारी यादी प्रसिद्ध होईल. 10 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत.
पालिकांचे आरक्षण असे
गंगाखेड : नागरिकांचा मागास प्रवर्ग-महिला (ओबीसी) 0 जिंतूर : नागरिकांचा मागास प्रवर्ग - महिला (ओबीसी) 0 मानवत : खुला प्रवर्ग - महिला 0 पाथरी : खुला प्रवर्ग
पूर्णा : खुला प्रवर्ग 0सेलू : नागरिकांचा मागास प्रवर्ग 0 सोनपेठ : अनुसूचित जाती.