आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तितर तस्करीचा, वन विभागाचा आठवडी बाजारात छापा, 124 पक्ष्यांना जीवदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - रविवारच्या आठवडी बाजारात काही पारध्यांनी विक्रीसाठी आणलेले 124 तितर पक्षी ठेवलेल्या तीन डाली विभागीय वन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने छापा मारून सकाळी पावणेनऊ वाजता जप्त केल्या. बाजारातील गर्दीत वनअधिकारी व पारध्यांत झालेल्या झोंबाझोंबीने तीन महिला व दोन पुरुष असे पाच आरोपी फरार झाले. त्यांच्यावर भारतीय वन्यजीव अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

15 दिवसांपूर्वीच शहरातील दगडीपुलाजवळील रविवारच्या आठवडी बाजारात वनविभागाने तितर पकडले. ही कारवाई ताजी असतानाच पुन्हा 6 जुलै रोजी सकाळी मच्छी मार्केटशेजारी तितर विक्रीसाठी आणले जाणार आहेत, अशी माहिती विभागीय वनअधिकारी आर.आर. काळे यांना खबर्‍यामार्फत मिळाली. त्यांनी वनपाल एस.पी.कदम, वनरक्षक एस.एस.कांबळे, अरविंद पायाळ, वनमजूर बंडू गिरी,सानप, वसंत वैद्य यांना सकाळी सात वाजता बाजारात पाठवले. पावणेनऊच्या दरम्यान तीन डालीमधून 124 तितर विक्रीसाठी आणले जात असल्याचे पथकाने पाहिले. मच्छी मार्केटजवळ तीन महिला व दोन पुरुष रस्त्यावर डाली टेकवताच खरेदीसाठी बाजारकरूंची गर्दी झाली.200 रुपयांना तितर जोडी असा भावही सुरू झाला. तेवढय़ात वन विभागाच्या पथकाने छापा मारून 24 हजार रुपये किमतीचे 124 पक्षी पकडले. या वेळी पथकाशी झालेल्या झटापटीत आरोपी फरार झाले.

सश्रम कारावासाची तरतूद
भारतीय वन्य जीव अधिनियम 1972 व 1991 कायद्यानुसार तितर या पक्षाला शासनाच्या वन खात्याने संरक्षण दिले आहे. या पक्ष्यांना पकडणे, पाळण्यास परवानगी नाही. तसेच या पक्ष्यांची हत्या करणार्‍या आरोपीवर गुन्हा नोंदवल्यानंतर त्याच्यावर आरोप सिद्ध झाल्यानंतर 50 हजार रुपयांचा दंड, व पाच वर्षांच्या सश्रम कारावासाची तरतूद आहे.
निसर्गाचं देणं निसर्गाच्या स्वाधीन
बाजारात पकडलेल्या तीन डाली खासबाग परिसरातील वनविभागाच्या कार्यालयात आणल्यानंतर 123 पक्ष्यांना ज्वारी, तांदूळ धान्य देण्यात आले. त्यानंतर एका जीपमध्ये तीन डाली ठेवून त्या पाली येथील बिंदुसरा येथील वन विभागाच्या युवा शांतिवन प्रकल्पाच्या रोपवाटिका परिसरात नेण्यात आल्या. वनकर्मचार्‍यांनी 123 पक्ष्यांना सोडून जीवदान दिले. अशोक राठोड व बंडू गिरी या पंचासमक्ष पक्षी सोडण्यात आले.

तीन पक्ष्यांचा तडफडून मृत्यू
वन कर्मचार्‍यांच्या हातातील डाली हिसकावण्यासाठी पारधी महिला व पुरुषांनी झोंबाझोंबी सुरू केली. प्रकार पाहण्यासाठी बाजारकरूंनी गर्दी केली. गर्दीचा फायदा घेऊन तीन महिला व दोन पुरुष पसार झाले. वनमजूर बंडू गिरी यांनी एकाचा शर्ट पक डला. पण हिसका देऊन आरोपी पसार झाला. गिरी यांच्या हाती आरोपीचा नुसता शर्ट आला. या झटापटीत डालीतील तीन पक्ष्यांचा मृत्यू झाला.
फोटो - युवा शांतीवनात पक्ष्यांना निसर्गाच्या स्वाधीन केले
पुढील स्लाइड्सवर पाहा इतर फोटो...