आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारांअभावी तरुणाचा मृत्यू, गेवराई तालुक्यात डॉक्टरांच्या संपाचा फटका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - राजपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांच्या संपामुळे रुग्णांचे हाल होत आहेत. शनिवारी रात्री गेवराई तालुक्यातील 25 वर्षीय तरुणाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. डॉक्टरांच्या संपाचा हा जिल्ह्यातील पहिला बळी आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी डॉक्टरांना सेवेवर तत्काळ रुजू व्हा, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा दम भरला आहे.

गंगावाडी (ता. गेवराई) येथील गोविंद मधुकर नवले यांना शनिवारी रात्री अशक्तपणामुळे चक्कर आली. उपचारासाठी त्यांना कुटुंबीयांनी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र संप सुरू असल्याने एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नसल्याने त्यांच्यावर गेवराईत उपचार होऊ शकले नाहीत. त्यांना जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, रस्त्यातच अकराच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांअभावी जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग सोमवारपासून बंद करण्यात येणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक बोल्डे यांनी कळवताच जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी संप पुकारणार्‍या डॉक्टरांना आदेश जारी केला. सेवेवर तत्काळ हजर व्हा अन्यथा मेस्मा कायद्यान्वये कारवाई करण्याचा दम डॉक्टरांना भरला आहे.

नोटीस बजावली : जिल्हा रुग्णालयातील 19 डॉक्टरांना डॉ. बाल्डेंनी सेवेवर हजर होण्यासाठी नोटीसा बजावल्या. मात्र सर्वच डॉक्टर मुंबई येथे गेल्याने एकालाही नोटीस मिळाली नाही.

आता माघार नाही
4मेस्मा लावून प्रशासन आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र मागण्या मान्य झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही. होणार्‍या गैरसोयीला शासन जबाबदार आहे.’’ दिलीप मोटे,जिल्हाध्यक्ष, मॅग्मो