आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चोरीच्या सोन्यासाठी चार इराणींनी पेटवले; परळीतल्‍या इराणी वस्तीवरील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी- चोरीचे सोने तुझ्या घरात का ठेवू दिले नाही म्हणून चार जणांनी महिलेच्या अंगावर  रॉकेल  ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना  परळी  शहरातील अशोकनगर भागातील इराणीवस्तीवर शुक्रवार, २३ नोव्हेंबर रोजी रात्री दहा वाजता घडली. या प्रकरणी महिलेच्या जबाबावरून  संभाजीनगर पोलिस ठाण्यात सोमवारी चार इराणी तरूणांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.   


परळी शहरातील आशोक नगर इराणी वस्ती येथील रहिवाशी असलेली  शेख शबाना शेख महेबूब (२०) ही  तिच्या राहत्या घरी जळाल्याची घटना घडली होती. हा प्रकार समजल्यानंतर संभाजीनगर पोलिस तिच्या घरी गेले तेव्हा पोलिसांना घराला कुलूप दिसून आले होते. महिलेला आंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेले होते. दरम्यान, सदरील महिलेने अंबाजोगाई येथील तहसीलदारांकडे जबाब नोंदवला असून या जबाबावरून तिला चार जणांनी पेटवून दिल्याचे समोर आले आहे.या प्रकरणी महिलेच्या जबाबावरून  जिनत, मखमल, ईरफान व जहीर (सर्व रा. इराणी गल्ली, परळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेतील आरोपी चोरीतील गुन्हेगार असून चोरीचा माल घरात ठेवू दिला नाही म्हणून दोघांनी शबानाच्या अंगावर कॅनमधील राॅकेल ओतून तिला  पेटवून दिले. तर अन्य दोघांनी मुले व पतीला मारून टाकतो अशा धमक्या दिल्या असल्याचे शेख शबाना शेख महेबूब या महिलने तक्रारीत म्हटले आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक उमाकांत कस्तुरे करीत आहेत.  

 

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल   
अंबाजोगाई येथील स्वारातील रुग्णालयात उपचार घेत असलेल्या शेख शबाना या परळीतील महिलेला जेव्हा चार जणांनी पेटवले तेव्हा त्या ठिकाणी परळीतील एक पोलिसही या घटनेच्या वेळी हजर होता.  या घटनेची माहिती देणारा महिलेचा एक व्हिडिओ दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. 

 

अंधश्रद्धेचीही होती चर्चा   
जादूटोणा व अंधश्रद्धेतून  शेबाना हीने  जाळून घेतल्याची शुक्रवारी परळीत  चर्चा होती. संभाजीनगर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच शहानिशा करण्यासाठी पोलीस  घटनास्थळी गेले होते मात्र  जळीत महिलेच्या घराला कुलूप होते. पती मारहाण करतो अशी तक्रार महिलेने आठ दिवसापूर्वीच पोलिसांकडे केली होती. या प्रकरणी अदखल पात्रही गुन्हा दाखल करण्यात आला होता.   

 

शेजारील तरुणांवर आरोप
शेख शबाना (रा.अशोकनगर) या महिलेने चोरीचे सोने तिच्या घरात लपवून ठेवले नाही  म्हणून तिला तिच्या शेजारी राहत असलेल्या चार तरूणांनी पेटवले असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला असून चौकशी सुरू आहे.  
- उमेश कस्तुरे, पोलिस निरीक्षक, संभाजीनगर 


ती जबाब बदलत आहे   
परळी येथील नायब तहसीलदारांना सदरील महिलने जबाब दिला असून ती सतत जबाब बदलत आहे. एक पोलिसासह अन्य तीन जणांनी तिला पेटवले असल्याचा तिचा आरोप  अाहे. या प्रकरणात पाेलिसांचा काही सहभाग आहे का या दृष्टीने चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.   
- जी.श्रीधर, पोलिस अधीक्षक, बीड   

 

बातम्या आणखी आहेत...