आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीडमधील घटना: संशयखोर पतीनेच पेटवली कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड- चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा छळ करणा-या पुणे येथील ज्ञानेश्वर नागोराव घोडके याने पत्नीसोबतच छळाची माहिती मामा व आजोबांना सांगणा-या मुलीलाही द्वेषापोटी ओम्नी गाडीसह पेटवून दिल्याचा खळबळजनक प्रकार डोंगरकिन्हीजवळील (ता. पाटोदा) प्रकरणातून उघडकीस आला आहे. या प्रकरणी पत्नी, मुलीचा निर्घृणपणे जाळून खून करणारा आरोपी ज्ञानेश्वर घोडके याला पोलिसांनी गजाआड केले आहे.

बीड तालुक्यातील लोळदगाव येथील मूळचा ज्ञानेश्वर घोडके हा सध्या पुण्यात बिबवेवाडी परिसरात व्यवसायानिमित्ताने स्थायिक झाला आहे. पत्नी सुनीता (30), मुलगा श्रीदीप (12) आणि मुलगी दीपश्री (10) यांच्यासमवेत तो राहत असे. पत्नी सुनीताच्या चारित्र्यावर ज्ञानेश्वर संशय घेत असे. यातून तिला मारहाण करून त्रास द्यायचा. घरात आईला बाबा त्रास देतात, ही बाब मुलगी दीपश्री ही तिच्या मामांना तसेच आजोबांना सांगत असे. याचाही ज्ञानेश्वरला राग होता आणि मुलगी दीपश्रीचा तो द्वेष करत असे. 26 डिसेंबरला बीड येथील त्यांचे मेहुणे व सेवानिवृत्त फौजदार रावसाहेब बावळे यांच्या भाच्याच्या लग्नाला येण्यासाठी बुधवारी रात्री ते पुण्याहून निघाले. नगरला रात्री अकराच्या सुमारास जेवण करून निघाल्यानंतर डोंगरकिन्हीपर्यंतचे 90 किलोमीटर अंतर पार करण्याला ओम्नीला त्यांनी साडेचार तास लावले. पहाटे साडेतीनच्या सुमारास कारला आग लागली, पत्नी व मुलीचा कोळसा झाला. मुलगा व स्वत: सहीसलामत निघून जामखेडला रुग्णालयात गेला.
या घटनेत पोलिसांना त्याच्या वागण्यासह अनेक बाबी संशयास्पद वाटत होत्या. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला होता. यातच त्याचे मेहुणे रावसाहेब बावळे यांनी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवला. नगरहून निघाल्यानंतर साडेचार तासांनी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास डोंगरकिन्ही शिवारात भाटेवाडी तलावाजवळ येताच त्याने ओम्नी कार थांबवली. मुलगा श्रीदीपसह स्वत: गाडीतून खाली उतरून पत्नी, मुलीला कारसह पेटवून दिल्याचे तक्रारीत नमूद केले.
त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून जामखेडला रुग्णालयात असलेल्या ज्ञानेश्वर घोडके यास ताब्यात
घेतले. सध्या तो बीडला जिल्हा रुग्णालयात आहे.