आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना पालिका कर विभागात आग; अधीक्षकांची खुर्ची जळाली

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -शहरातील मालमत्तांची नोंद असलेल्या पालिकेच्या कर विभागात बुधवारी पहाटे लागलेल्या आगीत अधीक्षकांची खुर्ची जळाली आहे. हा प्रकार अनागोंदीवर पडदा टाकण्यासाठी झाल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. यासंदर्भात कोणतीही तक्रार पालिकेच्या अधिका-यांनी पोलिस ठाण्यात दिली नाही.
पालिकेच्या इमारतीत 8 व 9 क्रमांकाच्या खोलीत कर आकारणी व करवसुली अशा दोन विभागांचे कामकाज चालते. करवसुलीसाठी खास पथके स्थापन करण्यात आली आहेत. अवाजवी कर आकारणी होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी करण्यास सुरुवात केली. मात्र, कुणीही याबाबत आक्षेप न घेतल्यामुळे नियमाप्रमाणे करवसुली केली जात आहे. दरम्यान, आगीच्या या घटनेमुळे तर्कवितर्क लावले जात आहेत.
कर अधीक्षक हरिश्चंद्र आंधळे यांनी खुर्ची जळाल्यासंबंधीचा अहवाल बुधवारी मुख्याधिकारी बाबासाहेब मनोहरे यांच्याकडे सादर केला आहे. मच्छर कॉइलने आग : सायंकाळी मच्छर मारण्यासाठी कुणीतरी कॉइल लावली असावी. कॉइलमुळेच खुर्चीला आग लागली असावी, असे नगराध्यक्ष पद्मा भरतीया यांनी सांगितले.
कर आकारणीत गडबड
पालिका हद्दीत 44 हजार मालमत्ता आहेत. करवसुली सुरू असल्याने काहींनी करात दुरुस्ती करण्याच्या प्रयत्नात आकडे कमी-अधिक केले असावेत. ही गडबड कुणाच्या लक्षात येऊ नये, यासाठी पुरावाच नष्ट करण्याचा घाट असावा. मात्र, फक्त खुर्चीच जळाली व मालमत्ता कागदपत्रे सुरक्षित आहेत, असे सूत्रांनी सांगितले.