आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नाम’नामक रोपट्याचा वेलू आता पार गगनाच्या दिशेने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी स्थापन केलेल्या ‘नाम’ फाउंडेशनला ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंसह डाॅक्टर, समाजसेवकांच्या मदतीचे पाठबळ लाभत अाहे. विदेशातूनही नामसाठी मदतीचा अाेघ सुरू आहे. नामच्या कामाचे स्वरूप अाता लाेकचळवळीत बदलले अाहे. ‘नाम’नामक राेपट्याचा वेलू अाता गगनाच्या दिशेने वाढू लागलेला अाहे.
नामच्या कामाला समाजातील विविध स्तरातून मिळत असलेल्या पाठिंब्याने भारावलेल्या नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी ही माहिती पत्रकारांना देऊन हजाराे हात, शेकडाे लाेक नाम फाउंडेशनच्या संपर्कात अाल्याचे सांगितले. बीडला राज्यस्तरीय कीर्तन महाेत्सवात नामच्या वतीने अायाेजित २३ जोडप्यांच्या सामुदायिक साेहळ्याला हजेरी लावण्यासाठी अालेल्या नाना मकरंद अनासपुरे यांनी पत्रकार परिषदेत फाउंडेशनच्या कामाची माहिती दिली,
मकरंद अनासपुरे म्हणाले, हुंडा घेणारे तरुण नामर्द अाहेत. हुंड्यापायीच अनेक शेतकऱ्यांनी अात्महत्या केल्या. लातूरमधील एसटी पाससाठी अात्महत्या करणाऱ्या स्वातीने तिच्या सुसाइड नाेटमध्ये ‘माझे क्रियाकर्म करता त्यावरील खर्च बहिणीच्या लग्नासाठी वापरावा’ या उल्लेखित मुद्द्याकडे लक्ष वेधले.
बीड येथे बुधवारी सामुदायिक विवाह सोहळ्यात अभिनेता नाना पाटेकर मकरंद अनासपुरेंच्या उपस्थितीत दुपारी तीन वाजता २३ जोडपी विवाहबद्ध झाली. छाया : दीपक जवकर
‘देणाऱ्यांच्या हातां’नी ‘नाम’ बनली एक लाेकचळवळ
३४ मुलींना सायकल वाटप
बीडतालुक्यातील बेलवाडी गावातील ३४ मुलींना पिंपळनेर येथे शाळेत जाण्यासाठी बुधवारी लाेळदगाव येथे अभिनेता नाना पाटेकर मकरंद अनासपुरे यांनी बेलवाडी गावातील अंजना खिंडकर, मुक्ता खिंडकर, जनाबाई िखंडकर, पूजा चव्हाण, अश्विनी कदम, कविता कदम, भाग्यश्री गायकवाड, अनुराधा गायकवाड, ऋतुजा यादव, साेनाली यादव, साक्षी वाघे, निकिता मुळे, रंजना मुळे, अंजना वाणी, राजकन्या बन्सड, कविता यादव, निकिता यादव, निकिता मुळे, राधा मुळे, अंजना गायकवाड, अर्चना मुळे आदी मुलींना सायकलींचे वाटप केले.
बातम्या आणखी आहेत...