आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड मजुराच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून खून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

किल्लेधारूर -हात धरून विनयभंग केल्याने शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून अल्पवयीन मुलीस विहिरीत ढकलून खून केल्याचा प्रकार तालुक्यातील शिवनगर तांड्यावर रविवारी घडला. याप्रकरणी धारूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल
केला आहे.
शिवनगर तांडा येथील ज्योती शिवाजी आडे (17) ही मुलगी आई-वडील ऊसतोडणीसाठी कर्नाटकात स्थलांतरित झाल्याने तांड्यावर आजीसमवेत राहत होती. 22 डिसेंबर रोजी ज्योती दुपारनंतर अचानक गायब झाली. तिच्या चुलत्याने शोधशोध केली; परंतु तपास लागला नाही. त्यानंतर त्यांनी शोध सुरूच ठेवला असता त्यांच्याच शेतातील विहिरीत ज्योतीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी सुरुवातीला धारूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
ज्योतीचे वडील शिवाजी रामभाऊ आडे यांनी यासंदर्भात माहिती घेऊन मंगळवारी धारूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार मृत ज्योतीचा गावातीलच सुभाष दिगंबर आडे (24) या तरुणाने वाईट हेतूने हात धरला होता. तिने या कारणावरून त्यास शिवीगाळ केली होती. याचा राग मनात धरून सुभाषने ज्योतीला रविवारी ओढत विहिरीजवळ नेले आणि रागाच्या भरात विहिरीत ढकलून दिले. पाण्यात बुडून ज्योतीचा मृत्यू झाला, अशा आशयाच्या तक्रारीवरून धारूर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. उपविभागीय पोलिस अधिकारी के. ए. डोळे यांनी बुधवारी घटनास्थळी भेट दिली.