आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाचा मार्ग सुकर; बीडमधील ३६ अल्पसंख्याक विद्यार्थिनी दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- हातावरचेपोट असणाऱ्या घरातील ३६ मुली तीन मुले... त्यांच्या दैनंदिन समस्या निस्तरताच जगण्याची ऊर्मी संपून जायची वेळ... शिक्षणाचा मार्ग चाेखंदळून पाहिला; पण परिस्थितीमुळे तिथेही माघार घ्यावी लागली... अशा मुला-मुलींवर शाळा साेडण्याची वेळ अालेली असतानाच त्यांना एक ‘उस्ताद’ भेटले. शिक्षणाचे महत्त्व जाणणारे.. तळमळीचे! त्यांनी गरिबीचा भार उचलत त्या मुला-मुलींच्या अडचणीचे ‘गणित’ साेडवले. अापल्या वेतनातून ‘इन्दाज’ (स्वकमाई हिस्सा) देऊन ३६ मुली मुलांच्या ज्ञानार्जनाचा मार्ग सुकर केला.
शासनस्तरावर सध्या मुलामुलींची गळती रोखण्याचे काम सुरू अाहे. त्यात कितपत यश-अपयश येईल, हा भाग अलाहिदा! पण बीडमध्ये एका उर्दू शिक्षकाने नववी, दहावीतील प्रतिकूल परिस्थिती असलेल्या ३६ मुली मुले शाळाबाह्य होण्यापासून वाचवली. एजाज अहमद बेग असे त्यांचे नाव. अल्पसंख्याक समाजातील कामगारांच्या ३६ मुली मुलांच्या शिक्षणाचा भार बेग यांनी खांद्यावर घेतला आहे. मात्र, त्याला ते भार मानत नाहीत. कर्तव्य हीच भावना असल्याचे ते सांगतात. बेग आपल्या वेतनातील काही हिस्सा ज्याला उर्दूमध्ये इन्दाज म्हणतात, तो या मुलींच्या शैक्षणिक साहित्यावर खर्च करून त्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरित करतात. बेग बीड येथील जिल्हा परिषद कन्या प्रशालेत माध्यमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही शाळा पहिली शाळा म्हणूनही ओळखली जाते. शाळेतील मुली सर्वाधिक शाळाबाह्य होऊ लागल्याचे त्यांच्या निदर्शनास अाले. वीटभट्टी, हातगाड्यांवर काम करणाऱ्या मुस्लिम समाजातील कामगार या मुलींचे पालक शैक्षणिक खर्च भागवू शकतील, एवढी त्यांची परिस्थिती नाही, हे यातून समोर आले.

शालेय साहित्याचे वाटप
चालूशैक्षणिक वर्षापासून बेग यांनी ३६ मुलींना नववी दहावीला प्रवेश देऊन पाठ्यपुस्तके, वह्या, गणवेश, टिफीन बॉक्स, बॅग अादी साहित्याचे वाटप केल.

मुस्लिम समाजातील कामगारांच्या मुलींचे शैक्षणिक खर्च भागवू शकत नाही. शकतील, एवढी त्यांची परिस्थिती नाही.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या ३६ मुलींना दत्तक घेण्याचा निर्णय
उपक्रम वर्षभरापुरताच ठेवता दातृत्वाचा हा यज्ञ अखंड तेवत ठेवण्याचा मनाेदय बेग यांनी व्यक्त केला अाहे.

तत्कालीन सचिव सतीश त्रिपाठी यांच्याकडून प्रेरणा
अल्पसंख्याकविभागाचे तत्कालीन सचिव सतीश त्रिपाठी यांनी शाळाबाह्यांसाठी पर्यायी शिक्षण हमी केंद्रासारखे विविध उपक्रम राबवले होते. ते एका कार्यक्रमासाठी बीड येथे आले असता त्यांनी मुलींच्या शिक्षणाचे प्रमाण वाढवण्यासाठी पुढे आले पाहिजे, असे आवाहन केले हाेते.

शाळेतील पटसंख्या वाढण्यास मदत
खासगीशाळांमुळे झेडपी प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येवर परिणाम झाला. शाळा टिकली पाहिजे, अशी इच्छा जिल्हा परिषदेचे अर्थ बांधकाम सभापती संदीप क्षीरसागर, शिक्षण सभापती बजरंग सोनवणे यांनीही व्यक्त केली होती. दत्तक विद्यार्थी घेऊन उर्दूचे वर्ग पेठ बीड येथे सुरू केले. या उपक्रमामुळे शाळेतील पटसंख्या वाढण्यास मदत झाली आहे. एजाजअहमद बेग, शिक्षक, उर्दू कन्या प्रशाला
बातम्या आणखी आहेत...