आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीषण अपघातात सोलापूरचे दोघे ठार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वरील खड्डे चुकवण्याच्या नादात तालुक्यातील तलमोड गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर बस आणि कारच्या भीषण अपघात झाला. यात कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य एक गंभीर जखमी आहे. अपघात इतका भीषण होता की बस कारची टक्कर होऊन दोन्ही वाहने १५ फूट खोल पुलाच्या खाली दरीत कोसळली. बस सरळ उताराच्या दिशेने पुलाच्या खाली गेल्याने बसमधील २६ प्रवासी बचावले.

मल्लिकार्जुन वीरभद्रप्पा होर्ती (३७) जगन्नाथ मल्लिकार्जुन कळगी (३६, दोघे रा. भवानीपेठ, सोलापूर) अशी मृत व्यापाऱ्यांची नावे आहेत. तर कारचालक सुनील रघुनाथ चिरोळे जखमी झाला आहे. तालुक्यातील तलमोड गावानजीक असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक वर मंगळवारी पहाटे वाजता पिंपरी-चिंचवड डेपोची पुणे-हैदराबाद जाणारी बस (एमएच ०६ एस ८९५०) तलमोड पुलाजवळ आल्यानंतर रस्त्यावरील मोठा खड्डा चुकवण्याच्या नादात बस एकदम वळवण्यात आली. याच वेळी सोलापूर येथील मिरचीचे व्यापारी हैदराबादकडून सोलापूरकडे कारने ( एमएच १३ एझेड ८५५६) जात होते.

या वेळी झालेल्या धडकेत दोन्ही वाहने पुलाखाली कोसळली. बस सरळ दिशेने पुलाखाली गेल्याने मातीच्या ढिगाऱ्याला जाऊन आदळल्याने बसमधील २६ प्रवासी बचावले, तर बसचालक डी.आर. सारूकते (रा. पिंपरी चिंचवड,पुणे) यांना किरकोळ जखम झाली आहे. अपघातानंतर काही वेळाने प्रवाशांना दुसऱ्या बसमध्ये हैदराबादकडे पाठवण्यात आले. या प्रकरणी अनिल सिद्रामप्पा होर्ती यांच्या फिर्यादीवरून उमरगा पोलिस ठाण्यात बसचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अपघातानंतर दोन्ही वाहने १५ फूट खोल पुलाच्या खाली दरीत कोसळली.