आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Nikalje Murder Case : Talks After Foreinick Lab Report Prakash Ambedkar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निकाळजे मृत्यूप्रकरण : फॉरेन्सिक लॅबच्या अहवालानंतरच बोलू - प्रकाश आंबेडकर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


जालना - विलास निकाळजे मृत्यूप्रकरणी पोलिसांचा अणि फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आल्यानंतरच आपण भूमिका स्पष्ट करणार आहोत. प्रकरण गंभीर असल्याने आपण उगाच उथळ वक्तव्य करणार नाही. मात्र, पोलिसांनी लवकर अहवाल द्यावा, असे अवाहन भारिप बहुजन महासंघाचे संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
औरंगाबाद येथे 24 फेब्रुवारी रोजी धम्म महाअधिवेशन होत आहे, त्यासंदर्भात जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेण्यासाठी जालन्यात आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

खरपुडी येथील विलास निकाळजे या कार्यकर्त्याच्या मृत्यूस उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे हेच जबाबदार असल्याचा आरोप निकाळजे याच्या आईने केला आहे. याबद्दल अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, मृत्यूप्रकरणाची आपण सर्व माहिती घेतली आहे. अहवालानंतरच मृत्यूचे कारण, विष कोणते, त्याचे प्रमाण किती होते आदी प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. आपल्या माहितीनुसार या प्र्रकरणात राज्य सरकारनेही अहवाल मागवला असल्याचे अ‍ॅड. आंबेडकर यांनी याप्रसंगी सांगितले. पोलिसांनी या गुन्ह्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. कोणी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी, सत्य बाहेर येईलच, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विलास निकाळजे याची आत्महत्या असेल तर महसूल विभागाकडून आणि हत्या असेल तर समाजकल्याण विभागाकडून मदत मिळेल. मात्र, आताच महसूल विभागाची मदत घेतली तर समाजकल्याण विभागाच्या मदतीवर दावा सांगता येणार नाही, म्हणून याप्रकरणी महसूल विभागाची मदत नाकारली असल्याचे आंबेडकर यांनी सांगितले.