आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निर्मल ग्राम पुरस्कार योजना कायमची बंद, मागील वर्षीच्या पुरस्काराची रक्कम दिलीच नाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ग्रामीण भागातील उघड्यावरील प्रातर्विधी बंद करून ग्रामीण परिसर स्वच्छ व संुदर करणाऱ्या गावांना दिला जाणारा निर्मल ग्राम पुरस्कार केंद्राने बंद करण्याचे निर्देश दिले.

राज्यातील गावे पाणंदमुक्त होण्यासाठी राज्य शासनाने २००३ पासून निर्मल ग्राम पुरस्कार योजनेतून रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात येऊ लागले. गावांना पुरस्कार मिळाला असला तरी गावागावात पुरस्कारानंतर अस्वच्छतेचे प्रमाण कमी झाले नाही. केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने ६ नोव्हेंबर २०१५ रोजी या योजनेवरील खर्चाचा लेखाजोखा पाहता ही योजना बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्या योजना बंदच्या अध्यादेशानुसार २०१२-२०१३ मधील जाहीर झालेले निर्मल ग्राम पुरस्कार प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने २०१५ पर्यंतचे पुरस्कार रद्द झाले आहेत, असे पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने जाहीर केले आहे.

पुरस्काराच्या रकमेत कपात
गाव पाणंदमुक्त झाल्यानंतर प्राेत्साहन म्हणून २००३ पासून निर्मल ग्राम पुरस्कार याेजना जाहीर झाली हाेती. पाणंदमुक्त झालेल्या एका गावास सुरुवातीला दाेन लाख रुपयांपर्यंत बक्षीस िदले गेले. काही वर्षांनंतर बक्षिसाच्या रकमेत एक लाख रुपयांनी कपात झाली. २०११ मध्ये ही रक्कम थेट ५० हजार रुपयांवरच आली. २०१२-२०१३ मध्ये शासनाने गावे पाणंदमुक्त जाहीर केली खरी, पण बक्षिसाची रक्कम दिली नाही.
पुरस्कारासाठी नव्हे
^पूर्वी पुरस्कारासाठी अर्ज, समिती, दाैरा अशी प्रक्रिया हाेत असे. पुन्हा याच गावाची िनवड कशी? अाता असे पुरस्कार न देता गावांनी किती स्वच्छतागृहे बांधली याची माहिती अॉनलाइन भरावी व पाणंदमुक्त झाल्याची घाेषणा करत साेहळा साजरा करावा, अशा शासनाच्या सूचना अाहेत.
नामदेव नन्नावरे, मुख्य कार्यकारी अधिकारी
बातम्या आणखी आहेत...