आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नितेश राणे यांचा घणाघात- राज्य सरकार मराठाद्वेषी, समाजाचा अंत पाहतेय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी भव्य मूकमोर्चे निघत आहेत. मात्र हे सरकार मराठाद्वेषी असून समाजाचा अंत पाहत आहे. आगामी काळात मराठ्यांना हातात शस्त्रेच घ्यावी लागतील. त्यानंतरच्या परिणामांना सरकारच जबाबदार असेल, असा घणाघात करून स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आमदार नितेश राणे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
स्वाभिमान संघटनेच्या वतीने राज्यभर मराठा आरक्षण एल्गार मेळावे घेण्यात येत आहेत. कळंब शहरातील साई मंगलम कार्यालयात सोमवारी सत्तावीसावा मेळावा घेण्यात आला. या वेळी अध्यक्ष आमदार राणे यांच्यासह छावा संघटनेचे नानासाहेब जावळे, प्रकाश बोधले महाराज, नगराध्यक्ष मीरा चोंदे, माजी नगराध्यक्ष शिवाजी कापसे, विनोद गपाट, मराठवाडा संपर्कप्रमुख मनोज गरड, माधव गंभीरे, सचिन उदय, भागवतराव धस, अतुल कवडे, प्रकाश भोसले, जिल्हाध्यक्ष किरण टेकाळे आदी उपस्थित होते. राणे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये चोवीस मूकमोर्चे निघाले तरीही सरकारचे डोके ठिकाणावर आलेले नाही. या विक्रमी मोर्चाला मुका मोर्चा म्हणून टिंगल केली जात आहे. यावरूनच हे सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भात नारायण राणे समितीने अठरा लाख लोकांचा प्रत्यक्ष जाऊन सर्व्हे केला होता. यामध्ये मराठा समाजाची आर्थिक, शैक्षणिक व नाेकरीची काय स्थिती आहे. हे पूर्णपणे मांडले होते. या सरकारने हा अहवाल न्यायालयासमोर ठेवणे गरजेचे असतानाही राणे समितीचा अहवाल बाजूला करून बापट समितीचा अहवाल न्यायालयासमोर ठेवला. त्यामुळे आरक्षण थांबवले गेल. हे सरकार महिलांच्या सुरक्षेविषयी संवेदनशील नसल्याचा आरोपही राणे यांनी या वेळी केला.
मोर्चा दाबण्याचे प्रकार
मूकमोर्चांमधून पहिल्यांदाच मराठा समाजाची एवढ्या मोठ्या प्रमाणात खदखद समोर आली आहे. मात्र हे मूकमोर्चे दाबण्याचे काम सरकार करत असून मुळात या सरकारकडे मराठा समाजाला आरक्षण देण्याची इच्छाशक्ती नसल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

खरा इतिहास सांगणाऱ्यांना गोळ्या
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शपथा घेऊन हे लोक सत्तेवर आले आणि सत्तेवर आल्यावर सर्वच विसरून गेले आहेत. चुकीचा इतिहास लिहिणाऱ्यांचा सन्मान करत आहेत व खरा इतिहास सांगणाऱ्या गोविंद पानसरे यांना गोळ्या घातल्या जात आहेत. हीच त्यांची छत्रपती महाराजांविषयीची आस्था आहे का, असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.
बातम्या आणखी आहेत...