आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात ‘आप’ची चिंता कसली करता -अबू आझमी यांचे मत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - दिल्लीत पहिल्याच निवडणुकीत 28 जागा जिंकून दावेदार पक्ष झाला असला तरी महाराष्ट्र व अन्य राज्यांत अद्याप जन्मच झालेला नाही ! त्यामुळे आम आदमी पक्षाची चिंता कशाला करता ? आमचा काँग्रेस आणि भाजप दोन्हीला कायम विरोध राहणार आहे, असे समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी गुरुवारी येथे सांगितले.
मुस्लिम आरक्षणप्रश्नी गुरुवारी काढण्यात आलेल्या रॅलीत व अन्य कार्यक्रमांत आमदार आझमींची प्रमुख उपस्थिती होती. या दरम्यान पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशात वीस टक्के तर महाराष्ट्रात साडेतेरा टक्के मुस्लिम आहेत, परंतु आरक्षण नसल्याने नोकरी, व्यवसायात हा समाज दिशाहीन होत आहे. मुस्लिमांना दहशतवादी ठरवून जेलमध्ये डांबण्याचे काम हे सरकार करत आहे. त्यामुळे आज महाराष्ट्रात सुमारे चाळीस टक्के मुस्लिम युवक निष्पाप असूनही कारागृहात आहेत, तसा अहवाल टाटा इन्स्टिट्यूटने दिला आहे. मुस्लिम आरक्षणासंदर्भातील गोपालसिंह समितीचा अहवाल या सरकारने केराच्या टोपलीत टाकला आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी सन 2004 मध्येच या अहवालानुसार आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता झाली नाही, असेही ते म्हणाले.