आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयाचा अवमान; साबळेचा जामीन रद्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भारत नगरदंगल आणि पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असलेला आकाश साबळे याचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द केला. दोन गुन्ह्यांत न्यायालयाने अटी शर्तींवर साबळेला जामीन मंजूर केला होता. मात्र, अटी-शर्तींचे उल्लंघन आणि न्यायालयाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत न्यायालयाने मंजूर केलेला जामीन अर्ज रद्द केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतनगर दंगल प्रकरण पिटाअंतर्गत गुन्हा दाखल असलेला आकाश साबळे याचा जामीन अर्ज न्यायालयाने रद्द केला. या गुन्ह्यांत साबळेला रविवार गुरुवार या दिवशी पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र, साबळेकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याने मुंबई नाका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाचे मंगळवारी (दि. ९) हजर राहण्याचे अादेश असूनही साबळे हजर झाला नाही.
निरीक्षक महाजन यांनी हजेरी रजिस्टर अाणि नोटिशीला उत्तर दिले नाही. संशयिताकडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होत असल्याचे निरीक्षक महाजन यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. सरकारी पक्षाची बाजू ग्राह्य धरत न्यायाधीश सुचित्रा घोडके यांनी साबळेचा जामीन रद्द केला. सरकारी पक्षातर्फे अॅड. पंकज चंद्रकोर, वरिष्ठ निरीक्षक महाजन यांनी युक्तिवाद केला. दरम्यान, साबळेच्या मागावर तीन पथके पाठविण्यात आली आहेत.