आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Changes In Election Seat Distribution R.R.Patil

निवडणुकीतील जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला कायम, बदल नाही - आर. आर. पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - आगामी निवडणुकांतील जागावाटपावर निष्कारण वाद उकरून काढून वातावरण कलुषित केले जात आहे. वास्तविक जागावाटपाचा फॉर्म्युला कित्येक वर्षांपूर्वीच ठरला आहे. त्यात बदल होणार नाही. ताणून धरत असली तरी काँग्रेस लवकरच जमिनीवर येईल, अशा शब्दांत राष्‍ट्रवादीचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी काँग्रेसवर तोफ डागली.
पत्रकारांशी बोलताना पाटील म्हणाले, ग्रामीण भागात काही लोकांना पंक्तीत जेवताना आपले ताट सोडून शेजा-याच्या ताटाकडेच पाहायची सवय असते. यात शेवटी ते न जेवताच उठतात. जागावाटपावरून आमचा मित्र काँग्रेसची भूमिका तशीच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
दाभोलकर हत्या; सूत्रधाराला पकडू
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने चालू आहे. त्याबाबत या वेळी माहिती देणे योग्य ठरणार नाही. या प्रकरणातील केवळ मारेकरीच नाही तर त्यामागचे सूत्रधारही पकडून ते समोर आणू, अशी ग्वाहीही पाटील यांनी दिली.