आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मोर्चातील मागण्या मान्य होईपर्यंत पुढाऱ्यांना गावबंदी, हिंगोलीतील पंचायतचा ठराव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली- मराठा समाजाने आरक्षण आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरात काढलेल्या मोर्चातील मागण्या मान्य होत नाहीत तोवर सत्तेतील पुढाऱ्यांना गाव बंद करण्याचा ठराव तालुक्यातील डिग्रस कऱ्हाळे येथील ग्रामसभेने स्वातंत्र्यदिनी घेण्यात आलेल्या सभेत संमत केला आहे.
 
सरपंच बळीराम कऱ्हाळे आणि ग्रामसेवक व्ही. एन. काटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव संमत करण्यात आला आहे. मराठा समाजाने राज्यभरात काढलेल्या मोर्चातून समाजाला आरक्षण देण्यात यावे, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यात दुरुस्ती करण्यात यावी, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशी देण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या होत्या.
 
राज्यभरात मोर्चे काढल्यावर ९ ऑगस्ट रोजी मुंबईतही मोठा मोर्चा काढण्यात आला होता. यापूर्वी जिल्ह्यातील आठ ते दहा ग्रामपंचायतींनी आरक्षण देण्याचे ठराव घेऊन जिल्हा परिषदेला आणि राज्य शासनाला पाठवले होते, तर आता डिग्रस कऱ्हाळे ग्रामपंचायतीने १५ ऑगस्ट रोजी ग्रामसभेत ठराव घेऊन सत्ताधारी भाजप–शिवसेना आणि त्यांच्या सहकारी पक्षांच्या नेत्यांना गावबंदी केली.
 
सत्ताधाऱ्यांना विसर
समाजाच्या मागण्या या वास्तव आहेत. या मागण्यांचे आश्वासन देऊनच भाजप–शिवसेना सत्तेवर आले आहेत. परंतु सत्ता आली की हे दोन्ही पक्ष आपला शब्द विसरले आहेत. त्यामुळे त्यांना गावबंदी करण्याचा ठराव आम्ही घेतला असून, मागण्या मान्य होईपर्यंत अंमलबजावणी करत राहू.  
– कवी शिवाजी कऱ्हाळे, ग्रामस्थ, डिग्रस कऱ्हाळे.
बातम्या आणखी आहेत...