आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जय महाराष्ट्र म्हणायला कोणीही अडवू शकत नाही: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सांगोला - देशात 'जय महाराष्ट्र’ म्हणायला कोणीही अडवू शकत नाही. हा आमचा घटनात्मक अधिकार आहे. अशा वक्तव्यामुळे  देशातील वातावरण खराब होत आहे. याबद्दल कर्नाटक सरकारकडेही आम्ही नाराजी व्यक्त करू. तसेच केंद्र सरकारलाही माहिती देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी सांगितले.
 
फडणवीस यांनी सांगोला तालुक्यातील मानेगाव,  डोंगरगाव येथील जलयुक्त शिवार, कंपार्टमेंट बंडिंग, विहीर पुनर्भरण,  शेततळे,  घरकुलाची कामे आणि अॅपल बोर लागवडीची पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, अादी उपस्थित होते.   
 
घाईगडबडीत दौरा : आमच्या गावात जलसंवर्धनाची हिवरे बाजार,  राळेगणसिद्धीपेक्षा सरस कामे झाल्याचे डोंगरगाव ग्रामस्थांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितले. त्यामुळे आपण सुरू केलेली जलयुक्त शिवार योजना यशस्वी झाल्याचा आनंद  मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. मात्र, मुख्यमंत्र्यांचा हा दौरा घाईगडबडीत झाला. त्यामुळे ते आले, त्यांनी पाहिले आणि गेेले अशी चर्चा ग्रामस्थांत होती.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, शिवसेनेच्या मंत्र्यांना कानडी सरकार बेळगावात राेखणार...
बातम्या आणखी आहेत...