आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Use Of Reservation For Backwarkclass :prakash Ambedkar

मागासवर्गीयांच्या राखीव जागांची उपयुक्तता संपली : प्रकाश आंबेडकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - राखीव जागांवर निवडून येणारे काँग्रेस-भाजप नेत्यांची हुजरेगिरी किंवा बॅगा उचलण्याचेच काम आजपर्यंत करत आले आहेत. मागासवर्गीयांसाठी राखीव असलेल्या जागांची उपयुक्तता आता संपली आहे, असे प्रतिपादन भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी जिल्हा परिषदेत अध्यक्षांच्या कक्षामध्ये पत्रकार परिषदेत केले.

औरंगाबाद येथे 23 व 24 फेबु्रवारी रोजी होणा-या ऑ ल इंडिया बुद्धिस्ट महासभा अधिवेशनाच्या पूर्वतयारी मेळाव्यासाठी प्रकाश आंबेडकर मंगळवारी नांदेड शहरात आले होते. ते पुढे म्हणाले की, सुशीलकुमार शिंदे यांनी हिंदू आतंकवादाबद्दल केलेल्या वक्तव्याचे पुरावे संसदेसमोर ठेवावेत. तसे पुरावे शासनाकडे आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष बंदरनायके यांनी भारत स्वतंत्र झाला तेव्हा बुद्धांच्या काही अस्थी सुपूर्द केल्या होत्या, त्या अस्थी शासनाने आजपर्यंत तिजोरीत बंद करून ठेवल्या आहेत. त्या अस्थी दिल्लीत बुद्ध पार्कसाठी राखीव असलेल्या जागेवर भव्य वास्तू उभारून तेथे ठेवाव्यात.