आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेला वेबसाइट अपडेटचा विसर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये सहा डिव्हिजन्सचा समावेश आहे. सर्व डिव्हिजन्ससाठी स्वतंत्र रेल्वे वेबसाइट आहे. यामुळे प्रवाशांना घरी बसून ऑनलाइन रेल्वे वेळापत्रकाची माहिती घेता येते. मात्र, नांदेड डिव्हिजनची वेबसाइट काही महिन्यांपासून अपडेट झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. याविषयी काही लोकप्रतिनिधींनी रेल्वेला निवेदन देऊन माहिती अपडेट ठेवावी, असे कळवले आहे.
दक्षिण मध्य रेल्वे झोनमध्ये सिकंदराबाद-विजयावाडा-गुटुंकाल, गुंटूर, गुनफुकल व नांदेड असे सहा डिव्हिजन्स येतात. या सर्व डिव्हिजन्ससाठी दक्षिण मध्य रेल्वेची स्वतंत्र वेबसाइट आहे. या वेबसाइटमुळे प्रवाशांना विभागीय व्यवस्थापकाची माहिती, त्यांचा संदेश, रेल्वेतील अधिका-यांचे नाव त्यांचे संपर्क क्रमांक, रेल्वे विभागाने किती ठिकाणी काम केले, किती ठिकाणी काम सुरू आहे, कोणत्या महिन्यात लाइन ब्लॉक व मेगा ब्लॉक असणार, नवीन रेल्वे किती सुरू झाल्या, कोणत्या रेल्वेपत्रकात बदलझाला, सणानिमित्त रेल्वेची काही विशेष सवलत आहे का, भविष्यात रेल्वेच्या काही योजना आहेत का? तसेच रेल्वेच्या रोजच्या घडामोडी या वेबसाइटवर अपडेट असाव्यात. मात्र, काही महिन्यांपासून नांदेड डिव्हिजन ही वेबसाइट अपडेट करण्याचे विसरले आहे. प्रवाशांनी नांदेड डिव्हिजनची वेबसाइट सर्च केली, तर सर्व विषयांची माहिती जुनी दिसते.
ऑनलाइन सुविधा असूनही रेल्वेची अपडेट माहिती मिळत नाही. अन्य डिव्हिजन्सप्रमाणे नांदेड डिव्हिजननेही रेल्वेची माहिती रोज अपडेट ठेवावी, अशी मागणी गंगापूरचे (जि. औरंगाबाद) आमदार प्रशांत बंब आणि मराठवाडा रेल्वे प्रवासी सेनेचे अध्यक्ष संतोष सोमाणी व राजकुमार सोमाणी यांनी निवेदनाद्वारे विभागीय व्यवस्थापक पी. सी. शर्मा यांच्याकडे केली आहे.
आजच माहिती घेतो
वेबसाइट अपडेट असणे गरजेचे आहे. याविषयी आजच सर्व माहिती घेऊन डिव्हिजनची वेबसाइट रोज अपडेट ठेवण्याच्या सूचना कर्मचा-यांना देतो.
-राजेश शिंदे, वरिष्ठ जनसंपर्क निरीक्षक, नांदेड.