आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Exile Scam Affected Government, Said Madhya Pradesh CM Chauhan

घोटाळेबाज सरकारला आता हद्दपारच करा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री चौहान यांचे आवाहन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर/कडा - महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सरकारने विकासाच्या नावावर घोटाळे आणि घोटाळेच केले. आता जनतेला राज्यात सत्तापरिवर्तन हवे आहे. घोटाळेबाज सरकारला महाराष्ट्रातून हद्दपार करा, असे आवाहन मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले.तेलगाव येथे चौहान यांची सभा झाली. चौहान म्हणाले, प्रगत राष्ट्र अशी ओळख असलेल्या महाराष्ट्रात आज परिस्थिती बदलली आहे. मध्य प्रदेशही प्रगत राष्ट्र होत आहे. मात्र, महाराष्ट्राचा विकास झाला नाही. मध्य प्रदेशात उद्योगासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. आमच्या सरकारने समाजातील सर्व घटकातील लोकांसाठी विविध योजना राबवल्या मात्र महाराष्ट्रात अशा प्रकारच्या योजना तेवढ्या प्रमाणात राबवल्या नाहीत असेही ते म्हणाले.