आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमेदवाराचे मत नोटाला; सात कर्मचारी निलंबित; बॅलेट पेपर नीट न लावल्यामुळे मते वाया

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद / कळंब- तालुक्यातील गौर ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रभाग क्रमांक तीनमध्ये मतदान यंत्रावर बॅलेट पेपर तिरका लावल्यामुळे उमेदवारांच्या मतापेक्षा नोटाला मतदान जास्त झाले अाहे. काळजीपूर्वक तपासणी न करता मतदान प्रक्रिया पार पाडल्यामुळे मतदान केंद्रातील सात कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या निवडणुकीत प्रभाग क्र. ३ चा निकाल राखीव ठेवण्यात आला असून येथे पुन्हा मतदान होईल. कळंब तालुक्यातील ३० गावांची निवडणूक सोमवारी पार पडली. निकालादरम्यान बॅलेट पेपर तिरका लावल्याचे समोर आल्यानंतर उमेदवार शोभा अवधूत यांनी तक्रार दिली. याची चौकशी करून जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी निलंबनाचा प्रस्ताव दिला.
 
 
यांच्यावर झाली कारवाई  
निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी .बागल, केंद्रप्रमुख एल.आर.धावारे, तलाठी यू. सी. घुले, केंद्राध्यक्ष आर. बी. बिक्कड, शिक्षक बी.डी.कदम,  आर. ए. उकिरडे, एस. टी. समुद्रे.
बातम्या आणखी आहेत...