परभणी - तीन मतदारसंघांतील ७ उमेदवारांना वृत्तपत्रांमध्ये पेड न्यूज दिल्याप्रकरणी जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीने नोटिसा बजावल्या असून त्यांना ४८ तासांच्या आत उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत. परभणी मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार प्रताप देशमुख, भाजपचे आनंद भरोस, शिवसेनेचे राहुल पाटील, काँग्रेसचे इरफानउर रहेमान खान, गंगाखेडमधील रासपचे रत्नाकर गुट्टे, मनसेचे बालाजी देसाई, पाथरीतील अपक्ष मोहन फड यांच्याबाबतीत एकापेक्षा अधिक दैनिकांमध्ये एकाच मजकुराचे, एकच मथळा असल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे.