आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Now Competition For Zp President Post In Aurangabad

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आता जिल्हा परिषद अध्यक्षपदाची रस्सीखेच

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड- जिल्हा परिषदेच्या बदलत्या राजकारणात आघाडीच्या वाटाघाटीत अध्यक्षपद मनसेच्या वाट्याला गेल्यास अध्यक्षपदाचा मान तालुक्यातील शिवना गटाच्या सदस्या दीपाली काळे यांना मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्‍ट्रवादी काँग्रेस व मनसे आघाडीची सत्ता आहे. अध्यक्षपद काँग्रेस, उपाध्यक्षपद व दोन सभापती राष्‍ट्रवादी, तर दोन सभापती मनसेचे व एक पद काँग्रेसकडे आहे. नाहिदाबानो पठाण यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने त्यांचे सदस्यपद गेले व अध्यक्षपद रिक्त झाले. यामुळे कुणाचे नशीब उघडणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत राष्‍ट्रवादी व मनसेच्या मदतीने काँग्रेसची सरशी होऊन सुभाष झांबड विजयी झाले. निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी झालेल्या तडजोडीत मनसेने अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदारी मांडली आहे. उर्वरित सव्वा वर्ष मनसेला दिल्यास पुढील अडीच वर्ष पाठिंबा कायम ठेवण्याचा शब्द आजच देण्यास तयार आहे. या दावेदारीच्या आधारावरच त्यांनी काँग्रेसला मदत केल्याची चर्चा आहे. या चर्चेनुसार अध्यक्षपद मनसेकडे गेल्यास तालुक्यातील शिवना जिल्हा परिषद गटाच्या सदस्या दीपाली काळे यांची उमेदवारी नक्की मानली जात आहे.

अध्यक्षपदाच्या संदर्भात पक्षश्रेष्ठी ठरवतील त्या उमेदवारास मतदान करू. सिल्लोड तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्यास स्वागत आहे.
रामदास पालोदकर, नेता, राष्‍ट्रवादी काँग्रेस

आघाडीच्या करारानुसार काँग्रेसकडे अध्यक्ष व एक सभापतिपद, राष्‍ट्रवादीकडे उपाध्यक्ष व दोन सभापती, तर मनसेकडे दोन सभापतिपदे आहेत. करार अडीच वर्षांसाठी आहे. अध्यक्षपद रिक्त झाल्याने पुढच्या सव्वा वर्षासाठी त्याचा करारावर परिणाम होण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. अध्यक्ष काँग्रेसचाच होईल. - विनोद तांबे, गटनेता, काँग्रेस

अध्यक्षपद आम्ही सव्वा वर्षासाठी दावेदारी सांगितली आहे. आघाडीसोबत असल्याने त्यांच्याशी चर्चा होईल. अन्यथा अन्य पर्याय आमच्यासमोर खुले आहेत. अध्यक्षपद सिल्लोडला द्यायचे की पैठणला हा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठींचा राहील.
शैलेश क्षीरसागर, गटनेता, मनसे

आजपर्यंत स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीत असल्याने यासंदर्भात विचारच केलेला नाही. शेवटी पक्षाकडून आलेल्या आदेशानुसारच निर्णय होईल.
अनिल चोरडिया, गटनेता, शिवसेना

पक्षाचा निर्णय मान्य
मनसे, शिवसेना, भाजप एकत्र आले पाहिजेत. शेवटी पक्ष घेईल तो निर्णय मान्य असेल. तालुक्याला अध्यक्षपद मिळाल्यास स्वागतच आहे. ज्ञानेश्वर मोठे, गटनेता, भाजप.