आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Drip Irrigation In The Beed On The Israels Basis, Say Pankaja Munde

इस्रायलच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात ड्रिप इरिगेशनचा प्रयोग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- राज्यशासन ड्रिपसाठी पन्नास टक्के अनुदान देत असून उर्वरित पन्नास टक्क्यांतील दहा ते वीस टक्के पैसे लाभार्थीने भरावेत. उर्वरित ३० टक्के पैसे कॉर्पोरेट सेक्टरकडून घेऊन इस्रायलच्या धर्तीवर बीड जिल्ह्यात ड्रिप इरिगेशनचा प्रयोग राबवण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मंुडे यांनी बुधवारी बीडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, मराठवाड्याला सिंचनाचा स्पर्शही झाला नव्हता तेव्हा १९९५ मध्ये कारखाने बनण्याची सुरुवात झाली होती. राज्याचे जलसंधारण हे खाते लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे होते. तेव्हा दोन हजार कोटी रुपये खर्च करून त्यांनी पाण्यासाठी साठवण तलाव येथे उभे केले. दुष्काळी भागातील लोकांनी क्रॅश क्रॉप घेऊ नये, असे म्हणणे अन्यायकारक आहे. परंतु आताच्या पाण्याची परिस्थिती लक्षात घेऊन क्रॉपचे पॅटर्न तयार होणे गरजेचे आहे. ज्या साखर कारखान्याच्या ठिकाणी पाणी असेल अशा ठिकाणी ड्रिपवरच उसाचे पीक घेऊन पाण्याचे नियोजन केले पाहिजे.

परळी अंबाजोगाई तालुक्यात पायलट प्राजेक्ट करण्यासाठी मी तहसीलदारांना सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. वैयक्तिक लाभाच्या ज्या योजना आहेत त्यामध्ये राज्य शासनाचे ड्राॅपला पन्नास टक्के अनुदान असून ५० टक्के पैसे उरतात. यातील दहा ते वीस टक्के पैसे लाभार्थीने भरले पाहिजेत. उर्वरित पैसे कॉर्पोरेट सेक्टरमधून घेऊन इस्रायलच्या धर्तीवर ड्रिप इरिगेशनचा प्रयोग राबवून क्रॉप पॅटर्न ठरवणार आहे.

कौन्सिलचे अधिकारी येणार औरंगाबादला
जलयुक्त शिवारातील कामाची पाहणी करण्यासाठी येत्या फेब्रुवारी रोजी इस्रायल येथील कौन्सिलचे अधिकारी औरंगाबाद येथे येणार असून ते आम्हाला इस्रायलच्या धर्तीवर मराठवाड्यात पाण्याचे नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन करणार आहेत.

परळी, अंबाजोगाई प्रयोगिक तत्त्वावर
परळी अंबाजोगाई हे दोन्ही तालुके ड्रिप इरिगेशन करण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर आम्ही निवडले आहेत. बीडनंतर महाराष्ट्रात हा प्रयोग राबवता येईल का, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत, असे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले.

रोजी इस्रायल कौन्सिलशी बैठक
बीड जिल्ह्यात इस्रायलच्या धर्तीवर ड्रिप इरिगेशनचा प्रयोग करण्यासाठी फेब्रुवारी रोजी इस्रायल कौन्सिल पदाधिकाऱ्यांबरोबर माझी बैठक होणार आहे, त्यांनाही मी आवाहन करणार आहे की त्यांनी आम्हाला सहकार्य करावे, असेही मुंडे यांनी सांगितले.