आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनशताब्दी एक्स्प्रेस अखेर ऑगस्टपासून जालन्यातून; औरंगाबाद-फर्दापूरसह तीन रस्त्यांच्या चौपदरीसाठी निधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- आघाडीसरकारनेविधानसभा निवडणुकांपूर्वी जालना-वडीगोद्री, औरंगाबाद-पैठण आणि औरंगाबाद-फर्दापूर तीन रस्त्यांच्या चौपदरीकरणाची घोषणा केली होती. मात्र, निवडणुका डोळ्यापुढे ठेवून अर्थमंत्रालयाची परवानगी घेताच परस्पर ही घोषणा केली होती. त्यामुळे राज्य सरकारने या कामांना स्थगिती दिली आहे. परंतु लवकरच सर्व विभागांच्या परवानग्या घेऊन या तिन्ही मार्गांच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे यांनी सांगितले.

ते जालना येथे पत्रकारांशी बोलत होते. तत्कालीन आघाडी सरकारने या कामांसाठी निधी कोठून आणणार याची काहीच तरतूद केली नाही. शिवाय अर्थमंत्रालयाची परवानगी घेताच परस्पर या रस्त्यांच्या चौपदरीकरणाच्या कामांची उद्घाटने केली होती. मात्र, प्रत्यक्षात निधीची तरतूदच नसल्याने ही कामे सुरू होऊ शकली नाहीत, असे खासदार दानवे यांनी याप्रसंगी सांगितले.
जनशताब्दी एक्स्प्रेसला अखेर मुहूर्त
जालनेकरांनागेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेली जनशताब्दी एक्स्प्रेसला अखेर मुहूर्त मिळाला आहे. ऑगस्टपासून ही रेल्वे जालना येथून धावणार आहे. त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण झाली असून एका कार्यक्रमात खासदार रावसाहेब दानवे यांच्या हस्ते या गाडीला हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे.

व्यापारी शहर अशी ओळख असलेल्या जालना शहरातून थेट मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस असावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. त्यासाठी जनशताब्दी एक्स्प्रेस औरंगाबादऐवजी जालन्यातून सुरू करण्याची मागणी पुढे आली. मात्र या रेल्वेसाठी आवश्यक सुविधा जालना स्थानकावर उपलब्ध नसल्याने ही गाडी येथून सुरू करण्यासाठी अडचणी येत होत्या. खासदार दानवे यांच्या प्रयत्नातून येथे विविध सुविधा निर्माण करण्यासाठी कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून येथे बॅटरी चार्जिंग, रेल्वेची स्वच्छता,रेल्वेत पाणी भरणे आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या. खासदार दानवे यांनी नुकतीच रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन यासंदर्भात माहिती दिली.
एका दिवसात मुंबई वारी
जालनेकरांनाएका दिवसात जालन्याहून मुंबई येथे जाऊन परत येणे शक्य होणार आहे. पहाटे पाच वाजता निघाल्यानंतर सात तासांत म्हणजेच दुपारी १२ वाजेपर्यंत मुंबईत पोहाेचेल. त्यानंतर दुपारी २.३० वाजता ही गाडी मुंबईहून जालन्याकडे निघेल रात्री ९.३० वाजता जालन्यात पोहोचेल.

जालना-वडीगोद्रीचा प्रस्ताव
सप्टेंबर२०१४ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखालील पायाभूत सुविधा समितीने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला मंजुरी दिली होती. त्यात ४६.६ किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी ३४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचे सांगितले होते. बांधा, वापरा हस्तांतरित करा या तत्त्वावर या मार्गाला मंजुरी देण्यात आली होती. रस्ता तयार झाल्यानंतर पुढील ३० वर्षे या रस्त्यावर पथकर आकारला जाणार होता.
बातम्या आणखी आहेत...