आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Number Of Nomination Filed In Marathwada, Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

रणधुमाळी: मराठवाड्यात अर्जांचा पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड - जिल्ह्यातील ९ विधानसभा मतदारसंघांत शनिवारपर्यंत एकूण ४५१ उमेदवारांनी ६७६ उमेदवारी अर्ज दाखल केले. सर्वाधिक ९१ उमेदवार नांदेड दक्षिण मतदारसंघात आहेत. त्याखालोखाल ८० उमेदवार नांदेड उत्तर मतदारसंघात आहेत. सर्वात कमी २७ उमेदवार लोहा मतदारसंघात आहेत.
बीड | सहा विधानसभा मतदारसंघांतून २४६ उमेदवारांनी २५७ अर्ज दाखल केले. सर्वाधिक माजलगाव मतदारसंघातून ५७ उमेदवारांनी ८२ अर्ज दाखल केले, तर गेवराई संघातून सर्वात कमी १९ उमेदवारांनी ३५ अर्ज दाखल केले आहेत.
हिंगोली | जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांसाठी आतापर्यंत ९० उमेदवारांचे नामांकनपत्र दाखल झाले आहेत. सर्वात जास्त हिंगोली विधानसभेसाठी ४० अर्ज दाखल झाले.
लातूर | जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातून १७६ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
जालना | जिल्ह्यात आतापर्यंत १८५ उमेदवारांचे २६८ अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात दाखल झाले आहेत. आता प्रचारात रंगत
चढणार आहे.
प्रीतम मुंडेंना अशोक पाटलांचे आव्हान
बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी २५ उमेदवारांनी ३४ अर्ज दाखल केले आहे. लोकसभेसाठी भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे यांच्याविरुद्ध काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक पाटील यांच्यात लढत होणार आहे.