आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ओडिशाच्या चक्रपाणि महाराजांचा केजमध्ये मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केज - डिशा राज्यातील चिरंजीवी प्रधान चक्रपाणि महाराजांचा केज तालुक्यातील डोणगाव येथे रविवारी मध्यरात्री छातीत दुखत असल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

तालुक्यातील डोणगाव येथील जयदेव तांदळे यांच्या घरी 2 ऑगस्टला ओडिशा राज्यातील चिरंजीवी प्रधान चक्रपाणि महाराज वय 45 रा.भागाबनपुर,पो.टकराडा. ता. जि. बुगुडागुंजन हे शिष्य मोहन तुकाराम सुरवसे रा. काकरंजा ता.तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद यांच्या सोबत आले होते.दरम्यान 11 ऑगस्टला महाराजांच्या छातीत अचानक दुखू लागले. रात्री दवाखान्यात न जाता महाराजांनी झोपण्याच्या वेळी दूध घेऊन ते झोपले. सोमवारी सकाळी जयदेव तांदळे यांनी महाराज झोपलेल्या खोलीचा दरवाजा उघडला असता. महाराज मृतावस्थेत आढळून आले. मोहन सुरवसे यांनी केज ठाण्यात दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.