आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोपीच्या पत्नीने घेतले बदनामीच्या भीतीपोटी विष, रुग्णालयात मृत्यूशी झुंज

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई - पट्टीवडगाव येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयातील शिपाई महादेव तारशे याच्या खुनातील आरोपीच्या पत्नीने बदनामीच्या भीतीपोटी शुक्रवारी पहाटे विष प्राशन केले. स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात महिला मृत्यूशी झुंज देत आहे. दरम्यान, महिलेच्या पतीस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. व्ही. भतके यांनी 13 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

वेणुताई चव्हाण प्रतिष्ठान संचालित यशवंतराव चव्हाण विद्यालयातील शिपाई महादेव र्शीहरी तारशे (35) याचे चुलत भाऊ नवनाथ मुरलीधर तारशे याच्या पत्नीशी अनैतिक संबंध असल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा नवनाथ तारशे याच्यापर्यंत पोहोचली. याची कुठलीही खातरजमा न करताच नवनाथने 4 ऑगस्टला महादेवला शेतातील बांधकामावर नेऊन त्याचा खून केला व मृतदेह विहिरीत टाकला.

प्रकार लक्षात आल्यानंतर नातलगांनी महादेवचा मृतदेह बाहेर काढला. बर्दापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून नवनाथ तारशे याला अटक केली. या प्रकरणाची गावभर चर्चा सुरू झाल्याने अनैतिक संबंधांवरून बदनामीच्या भीतीपोटी राधा नवनाथ तारशे (28) हिने शुक्रवारी घरी विष प्राशन केले.