आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निराधार वृद्धेने अनुदानासाठी बँकेच्या दारात सोडले प्राण!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी (जि. बीड) - निराधार योजनेचे 6 महिन्यांपासूनचे थकीत अनुदान मिळण्याच्या आशेने आलेल्या पद्मिनीबाई जावळे (80) या वृद्धेने स्टेट बँकेच्या दारातच प्राण सोडला. मुलीकडे राहणार्‍या पद्मिनीबाई संजय गांधी निराधार योजनेचे मानधन मिळण्याच्या आशेने गुरुवारी बँकेत आल्या. गर्दीमुळे बराच वेळ त्या बँकेच्या दारात बसून होत्या. भोवळ येऊन कोसळल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी बँकेत बिले पाठवल्याचे तहसीलदार जी.एम. झंपलवाड यांनी सांगितले. तर बिले पास झाली नसल्याचे बँक व्यवस्थापक डी.व्ही. कुलकर्णी म्हणाले.