आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर कोर्टाच्या आवारात वृद्ध महिलेने रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- वेळेत न्याय मिळत नसल्याच्या समजातून न्यायालयाच्या आवारात गुरुवारी राहीबाई ज्ञानोबा सुरवसे (६०, धनेगाव, ता. लातूर) यांनी रॉकेल ओतून स्वत:ला पेटवून घेतले. ९८ टक्के भाजल्याने त्यांचा मृत्यू झाला. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.
पिशवीत रॉकेलची बाटली घेऊन आलेल्या राहीबाई न्यायालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील पायऱ्यावर गेल्या. तेथे कोपऱ्यात त्यांनी पेटवून घेतले. तशाच त्या खाली उतरत होत्या. ड्यूटीवरील पोलिस, वकील पक्षकारांनी आग विझवेपर्यंत त्या ९८ टक्के भाजल्या. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दोनएकर शेतीचा वाद
राहीबाईंचा मुलगा हरिरामने सांगितले, वडिलांच्या वाट्याची एकर गुंठे जमीन चुलत भावांनी आपल्या नावे करून घेतली. या खटल्याचा निकाल विरोधात गेल्याने त्यांनी जिल्हा न्यायालयात अपील केले. येथे राहीबाईंच्या बाजूने निकाल लागला. परंतु समोरील पार्टीने त्यास हायकोर्टात आव्हान दिले.

जिल्हा न्यायालयाने आपल्या बाजूने निकाल दिल्याने जमिनीचा ताबा मिळावा, असे राहीबाईंना वाटायचे. परिणामी तारीख नसतानाही त्या कोर्टात यायच्या. निर्णय आपल्या बाजूने लागला आहे, पण शेतीचा ताबा मिळत नसल्याच्या निराशेतून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले.