आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात जादूटोण्याच्या संशयातून वृद्धाचा खून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- जादूटोणा, करणी करत असल्याच्या संशयावरून वृद्धाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी ४.३० वाजता जालना तालुक्यातील रेवगाव शिवारात ही घटना घडली. भगवान शंकर कुमकर (६५) असे मृताचे नाव आहे.
भगवान कुमकर हे दिवसभराचे काम आटोपून सायंकाळी शेतातून घरी परत येत होते. याच वेळी भानुदास आसाराम कुमकर व त्याची दोन मुले जगन व सोमनाथ ऊर्फ एकनाथ यांनी भगवान यांना रस्त्यातच अडवले. तू जादूटोणा व करणी करतोस, असे सांगून भगवान यांच्या डोक्यात दगड घातला. गंभीर जखमी झाल्याने भगवान यांचा जागेवरच मृत्यू झाला. याबाबत मृताचा मुलगा नारायण भगवान कुमकर यांनी तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणात पोलिसांनी प्रथम अकस्मात मृत्यूची नोंद केली. त्यानंतर रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.