आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On 27 July Bomby Explosion May Be Happen In Pune, Mumbai

पुणे, मुंबईत 27 जुलै रोजी बॉम्बस्फोटाचा इशारा, गुप्तचर खात्याचे पत्र

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - जुलै महिन्यातील 27 तारखेला मुंबई, पुणे, हैदराबाद येथे अतिरेक्यांकडून बॉम्बस्फोट घडवण्याची शक्यता शासनाच्या गुप्तचर विभागाने वर्तवली आहे. तशा आशयाचे पत्रच जारी करण्यात आले असून एटीएस प्रमुखांद्वारे राज्यात पोलिसांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.


1996 पासून राज्यामध्ये बॉम्बस्फोटाच्या मालिकाही घडल्या. जुलमध्ये राज्यात पुन्हा बॉम्बस्फोट होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्याने तपास यंत्रणांचे धाबे दणाणले आहे. गुप्तचर विभागाने तशी शक्यता गृह खात्याकडे वर्तवली आहे. गृह खात्याने पोलिस महासंचालकांना अन् पोलिस महासंचालकांनी ते औरंगाबादच्या विशेष पोलिस महानिरीक्षकांना पत्र पाठवले आहे. त्यात स्फोटाची शक्यता वर्तवण्यात आली असून संशयास्पद हालचालींवर बारीक लक्ष ठेवण्याचे सांगितले आहे.


राज्यातील धार्मिक स्थळे, महत्त्वाची ठिकाणे, धरणे, सार्वजनिक ठिकाणे, ऐतिहासिक ठिकाणे, महत्त्वाच्या बाजारपेठा, शॉपिंग मॉल्स, सिनेमागृहे, पार्किंग आदी ठिकाणी गस्त वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रतिबंधात्मक दृष्टीने नाकेबंदी, कोम्बिंग ऑपरेशन करावे, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.