आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिक संघाचा सोमवारी वर्धापन दिन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर : ज्येष्ठांचे आरोग्य, सुरक्षा आणि आर्थिक नियोजन करून त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणाऱ्या महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचा (फॅस्कॉम) ३६वा वर्धापन दिन सोमवारी लातूरमध्ये साजरा होणार आहे.
पारिजात मंगल कार्यालयात सोमवारी सकाळी डॉ. अशोक कुकडे यांच्या हस्ते उद्घाटन होईल. संध्या छाया सुखविती हृदया या विषयावर ते ज्येष्ठांशी संवाद साधणार आहेत. मुंबई येथील फेस्कॉमचे अध्यक्ष द. तु. चौधरी, डॉ. शं. पां. किंजवडेकर, डी. एन. चापके, अरुण रोडे या वेळी उपस्थित राहतील.
सोमवारीच सकाळी ६ ते ७ या वेळेत योगसाधना, सांधेदुखी, गुडघेदुखी यावर डॉ. महेश कुलकर्णी दुसऱ्या सत्रात ज्येष्ठांना मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी १२ वाजता फॅस्कॉमच्या सचिव अरुणा रोडे ज्येष्ठांच्या समस्या या विषयावर मार्गदर्शन करतील. दुपारी ३ वाजता खुले चर्चासत्र होईल.
महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ अर्थात फेस्कॉम संघटनेचे महाराष्ट्रात चार हजारांच्या वर संघ असून ९ लाखांच्या वर सदस्य संख्या असलेली महाराष्ट्रातील ही सर्वात मोठी संस्था आहे.
महासंघात ३०० च्या वर संघ हे केवळ महिलांचे आहेत. ग्रामीण भागातील महिलांना उद्योजक बनवणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे यासाठी स्वतंत्र महिला अधिवेशन दरवर्षी घेतले जातात. फेस्कॉमचे लातुरात आयोजित हे मराठवाड्यातील चौथे अधिवेशन आहे. मराठवाड्यात यापूर्वी गुंजोटी, नांदेड, औरंगाबाद येथे अधिवेशने घेण्यात आली आहेत.
बातम्या आणखी आहेत...