आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चाकूर तालुक्यातील वडगाव येथे पुन्हा गूढ आवाज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - चाकूर तालुक्यातील वडगाव (एक्की) येथे शनिवारी रात्री पुन्हा गूढ आवाज आल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. रविवारी स्थानिक आमदार बाबासाहेब पाटील यांनी गावाला भेट देऊन नेमका प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि उच्चस्तरीय पथकाकडून पाहणी होण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे घालणार असल्याचे सांगितले.

वडगाव येथे 28 ऑगस्ट आणि 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता रात्री 8 वाजता आणि मध्यरात्री दोन वाजता असे आवाज आले. त्यांनतर 21 सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता, रात्री 10 आणि साडेदहाच्या सुमारास गूढ आवाज आला. यापूर्वी 28 ऑगस्ट रोजी गूढ आवाज आल्यानंतर भूगर्भतज्ज्ञांनी वडगावला भेट देऊन पाहणी केली होती. त्या वेळी त्यांनी जमिनीत पोकळी निर्माण झाल्यावर त्यात जर पाणी शिरले तर तसा आवाज होऊ शकतो, असे म्हटले होते.