आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोठडीतून पळालेल्या आरोपीस पकडले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - बालगुन्हेगार असल्याचे भासवत बालकल्याण समितीच्या कोठडीत गेलेला आणि तेथून गुंगारा देऊन पळालेल्या एकाला पोलिसांनी पकडले. त्याने सहा घरफोड्या आणि तीन दुचाकींची चोरी केल्याचे उघड झाले असून त्याच्याकडून पाच लाख ६८ हजारांचा मालही ताब्यात घेण्यात आला आहे.  

पोलिस अधीक्षक शिवाजी राठोड यांनी सांगितले की सुमित गर्गेवाड नावाचा एक आरोपी आपले वय कमी असल्याचे भासवत होता. त्याच्याकडील कागदपत्रांमुळे त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. मात्र त्याने गेल्या महिन्यात गुंगारा देऊन पळ काढला होता. एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने चाकूर तालुक्यातल्या भाटसांगवी येथून त्याला पकडले.
 
त्याची चौकशी केली असता त्याने यापूर्वी लातूर शहरात ६ घरफोड्या केल्याचे कबूल केले. तसेच ३ दुचाकीही चोरल्या असल्याचे सांगितले. दरम्यान, त्याच्याकडून दोन हार, लॉकेट, मणी,  मंगळसूत्र, अंगठी असा पावणेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले असता त्याला रविवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, त्याच्यावरील आतापर्यंतचे गुन्हे, त्याचे आतापर्यंतचे गुन्ह्यांचा तपशील पाहता त्याच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवणार असल्याचे पोलिस अधीक्षक राठोड यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...