आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारा हजार रुपयांची लाच घेताना गृहपाल अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- हजेरीवरील बिलावर सही देण्यासाठी बारा हजारांची लाच घेताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहातील गृहपालास ताब्यात घेतले आहे. ज्ञानदेव किसनराव खेडकर असे लाच घेणाऱ्या गृहपालाचे नाव आहे.   

अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह येथील हाऊसकिपिंगचे काम मुंबई येथील एका खासगी कंपनीला मिळाले आहे. तक्रारदार यांना सदर कंपनीने अंबड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतिगृहात व्यवस्थापक म्हणून नेमले आहे. तक्रारदार व त्यांच्या हाताखालील कर्मचाऱ्यांचे हजेरी बिलावर गृहपाल ज्ञानेश्वर खेडकर यांची सही लागत असते. त्यांची सही झाल्यावर बिल समाजकल्याण विभागाकडे सादर केले जाते.
 
दरम्यान, तक्रारदार खेडकर यांच्याकडे हजेरी मस्टर सहीसाठी घेऊन गेले असता मागील व चालू बिलाचे असे १२ हजार घेऊन येण्याचे सांगितले. तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत खात्याला ही माहिती कळविली होती. 
बातम्या आणखी आहेत...