आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रॉड तुटल्याने ट्रक उलटला, त्यावर दुसरा ट्रक आदळला, एक ठार, २५ जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबड/ जालना- पंढरपूर येथील सत्संग आटोपून गावाकडे परतणाऱ्या विदर्भातील अकोट तालुक्यातील भाविकांच्या ट्रकचा रॉड (पाटा) तुटून तो उलटला. याच वेळी जालन्याहून हैदराबादकडे निघालेला दुसरा ट्रक त्यावर आदळल्यामुळे अपघात झाला. यात एक जण ठार, तर २५ भाविक जखमी झाले. अंबड-जालना रस्त्यावरील शेवगा पाटीवर सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ७ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना उपचारासाठी औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवले असून १८ जणांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अजबराव श्रीराम भुसे (४५) असे मृताचे नाव असून उर्वरित २५ जण गंभीर जखमी आहेत. जखमींमध्ये ८ पुरुष, १५ महिला व एका बालकाचा समावेश आहे. दरवर्षीप्रमाणे अकोट तालुक्यातील मुंडगाव व अकोलखेडातील भाविक पंढरपूर येथील तनपुरे महाराज मठावर आयोजित सत्संगासाठी गावातून १६ जानेवारी रोजी निघाले. ते १७ रोजी तेथे पोहोचले. दरम्यान, ट्रकमधून भाविक सत्संगाला गेले होते. या ठिकाणी १८ ते २४ तारखेपर्यंत सत्संग सोहळ्यात सहभागी झाल्यावर सर्व भाविक २४ रोजी दुपारी २ वाजता पंढरपूरहून परतीसाठी निघाले.
सोमवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास शेवगा पाटीजवळ आल्यावर ट्रकचा (एमएच २७ एक्स २०३) राॅड तुटला. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्यावरच आडवा झाला. याच वेळी जालन्याहून हैदराबादकडे जाणारा भरधाव ट्रक (टीएन ३० एई ३४०८) हा भाविकांच्या ट्रकवर जाऊन आदळला. अपघात एवढा भीषण होता की, क्षणार्धात भाविक ट्रकमधून बाहेर फेकले गेले व ट्रकसुद्धा चक्काचूर झाला. या वेळी झालेला आवाज ऐकून परिसरातील नागरिक अपघातस्थळी दाखल झाले. त्यांनी ट्रकमध्ये अडकलेल्या भाविकांना बाहेर काढले. तसेच ताबडतोब ही माहिती पोलिस व १०८ नंबरवर कॉल करून अॅम्ब्युलन्स सेवा देणाऱ्यांना कळवली. काही मिनिटांत अॅम्ब्युलन्स दाखल झाल्या. काही जखमींना जालना जिल्हा रुग्णालय, तर काहींना अंबड येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. दरम्यान, घटनास्थळी आमदार राजेश टोपे, उपविभागीय पोलिस अधिकारी रामेश्वर साेनुने, तहसीलदार महेश सावंत, पोलिस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी भेट दिली तसेच जखमींना रुग्णालयात पाठवण्यासाठी मदत केली.

यांना हलवले औरंगाबादला
रामदास सातपुते (५३), गंगाबाई तायडे (४५), दुर्गा अवचार (४५), अासिफ शहा (३०), पूनम अरुण ढाकदिवे (२५), भारत कतालसिंग असोले (५६), गजानन आसाराम फुसे (५५) यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

प्रमिला रमेश दुधे (६०), गयाबाई भोकरे (४५), कांताबाई तायडे (५०, सर्व रा. मुडगाव) तसेच गोकर्ण महादेव भोकरे (५५), माया भारत असोले (४५), गणेश सुरेश क्षीरसागर (१०), उज्ज्वला गोपाल लपेकर (४०), पार्वताबाई गजानन थोटे (६५), सुरेश गणेश क्षीरसागर (३५), यशोदा मधुकर जावळे (६०), गोकर्णाबाई किसन पाठक (६०), रत्नाबाई सखाराम भोकरे (५५), शीला गजानन फुसे (५०), वेणुबाई पांडुरंग माथूरकर (५०), हंसाबाई बबन पठाले (७०), सुखरंग राजपूत (५०), श्रीकांत वाघुंडे (३१), विजय गुलाब मसाने (३४, सर्व रा. अकोलखेडा, ता. अकोट, जि. अकोला).
पुढील स्लाइड्सवर वाचा, रस्त्याचे काम पाडले बंद...