आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गटविकास अधिकारी राठोडांचा अपघाती मृत्यू, नागपूर-अमरावती रस्त्यावरील दुर्घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- पालम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एस.डी.राठोड (४५) यांचा नागपूर-अमरावती रस्त्यावर बुधवारी (दि.२७) रात्री झालेल्या कार अपघातात मृत्यू झाला. ते महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (एमआरईजीएस) बैठकीसाठी नागपूर येथे गेले होते. तेथून परतताना त्यांचा अपघाती मृत्यू झाला.

राठोड मंगळवारी रात्री नागपूरला बैठकीसाठी गेले होते. बुधवारी बैठक आटोपून ते कारद्वारे (क्रमांक एम.एच.२२- यू ६५०१) परभणीकडे परतत होते. नागपूर ते अमरावती महामार्गावर बुधवारी रात्री एक वाजता समोरून येणाऱ्या इंडिका कारने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. त्यात राठोड यांचा जागीच मृत्यू झाला. राठोड यांचे मुळ कंधार तालुक्यातील नागलगाव हे असून त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.