आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माजलगाव धरणाच्या गेटला रंग देणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - माजलगाव धरणाच्या गेटला रंग देत असताना पाण्यात पडून परभणी येथील सय्यद अली सय्यद बाजाेद्दीन (२२) या तरुणाचा बुधवारी दुपारी दीड वाजता मृत्यू झाला.
माजलगाव धरणाच्या गेटला परभणी येथील गाैस फॅब्रिकेशनमार्फत रंग देण्याचे काम सुरू अाहे. मागील अाठ दिवसांपासून हे काम सुरू असून बुधवारी दुपारी सय्यद अली सय्यद बाजाेद्दीन हा तीन नंबरच्या गेटला रंग देण्यासाठी दाेरीच्या साह्याने रंग देत असताना अचानक त्याचा ताेल जाऊन ताे धरणात पडला. ही घटना घडली तेव्हा त्याच्या साथीदाराने अारडाअाेरड केली. पाण्याची खाेली जास्त असल्याने भाेई समाजाचे गाेपीनाथ कचरे, परमेश्वर घटे, शिवाजी कचरे, अर्जुन पलटरे, नारायण कचरे यांना बाेलावण्यात अाले. त्यांच्या चप्पूच्या साह्याने धरणात जाऊन शाेध घेतला असता तीन तासांनंतर तरुणाचा मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात अाला.

धरणाची सुरक्षा धाेक्यात
माजलगाव येथील धरणाची सुरक्षा सध्या धाेक्यात सापडली असून धरणाच्या पात्रात अनेक अपघात यापूर्वी घडलेले अाहेत. या ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे व वीज हमखास बंद असते. त्याचबराेबर फाेनही बंद असताे. पिण्याचे पाणी अाणण्यासाठी कर्मचाऱ्यांना दूरवर जावे लागते.
बातम्या आणखी आहेत...