आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद जिल्ह्यातील दुचाकी अपघातात एक ठार, एक गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटोदा: मित्राला बरोबर घेऊन पुण्याहून उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवजे गावाकडे जाणाऱ्या तरुणाला पाटोदा तालुक्यातील धनगरजवळा येथे नगर- बीड राज्य मार्गावरील वळण न दिसल्याने भरधाव दुचाकी खड्ड्यात जाऊन आदळली. या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला असून त्याचा साथीदार गंभीर जखमी झाला आहे. सूरज संजय जमाले (२४, रा. तळवजे, ता. जि. उस्मानाबाद)  असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.   

पुण्यातील खासगी कंपनीत नोकरी करणारा सूरज संजय जमाले   हा काही कामानिमित्त शुक्रवारी रात्री   पुणे  येथून सुजित भारत काळे (२२, रा. बोरडा, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) या मित्राला बरोबर घेऊन नगर - बीड राज्य मार्गावरून धनगरजवळा मार्गे उस्मानाबाद जिल्ह्यातील कसबे तळवजे या  गावी  दुचाकीवरून (एमएच २५  वाय  ०६३३) निघाला होता. नगर - बीड मार्गावर पाटोदा तालुक्यातील धनगरजवळका  येथे रस्त्यावरील वळणाचा त्याला अंदाज न आल्याने भरधाव दुचाकी खड्ड्यात गेली.  या अपघातात सूरज संजय जमाले जागीच ठार झाला, तर सुजित भारत काळे हा गंभीर जखमी  झाला.  
बातम्या आणखी आहेत...