आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"आॅर्डर नियमानुसारच एव्हरेस्ट इंडस्ट्रीजचा दावा', मुंडे चिक्की घोटाळा प्रकरण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - राज्यात गाजत असलेल्या पंकजा मुंडे यांच्या बहुचर्चित २०६ कोटी रुपयांच्या चिक्की घोटाळ्यातील एक पुरवठादार असलेल्या गंगापूरच्या एव्हरेस्ट इंडस्ट्रीजचा सुगावा लागला आहे.

शहरातील गणपती गल्लीत असलेल्या या कंपनीने या प्रकरणात वॉटर फिल्टरचा २ कोटी ६३ लाख ४५ हजार ४८१ रुपयांचा पुरवठा केला असून या कंपनीच्या मालकांनी मात्र ही आॅर्डर नियमानुसारच मिळाल्याचा दावा केला आहे. हे प्रकरण उघड झाल्यापासून गंगापूर येथील एव्हरेस्ट इंडस्ट्रीज या कंपनीचे नाव चर्चेत आले होते. मात्र, नेमका पत्त्याचा उल्लेख नसल्याने ही कंपनीच अस्तित्वात आहे की नाही याविषयी संभ्रम निर्माण झाला होता.

एव्हरेस्ट वॉटर फिल्टर या कंपनीचे मालक मंगेश शहाणे त्यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, या आॅर्डरमध्ये कुठलाही गैरव्यवहार झालेला नाही. मला मिळालेली आॅर्डर नियमानुसार मिळालेली आहे. मी उत्पादक नसून बडोदा येथील योग व्हॅली या कंपनीचा डिस्ट्रिब्युटर आहे, असेही ते म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...