आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत कॉन्स्टेबलचा जमादाराकडूनच खून, दोघेही पोलिस सख्खे शेजारी !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - हजार पाचशेंच्या गर्दीत गुरुवारी भरदुपारी झालेल्या पोलिसाच्या खुनामुळे परभणीत खळबळ उडाली आहे. आरोपी जमादार आणि खून झालेला कॉन्स्टेबल दोघेही एकाच बिल्डिंगमधील शेजारी होते. यापूर्वीही दोघांमध्ये वाद झाला होता.
कॉन्स्टेबल खंडेराय सोडगीर यांचा जमादार आरेफोद्दीन गुलाम दस्तगीर फारुकी यांनी परभणीत भरदिवसा खून केला. हे दोन्ही पोलिस कर्मचारी हे जिल्हा पोलिस मुख्यालयात असलेल्या पोलिस कर्मचा-यांच्या निवासस्थानात एकाच बिल्डिंगमधील रहिवासी होते. दोघांचीही घरे शेजारीच असल्याने त्यांच्यात यापूर्वी चांगले संबंध होते, परंतु मध्यंतरीच्या काळात त्यांच्यात चांगलाच वाद उद्भवला होता, असेही एका पोलिस कर्मचा-याने सांगितले. विशेष बाब म्हणजे, खंडेराय सोडगीर हा सात वर्षांपूर्वी शहर वाहतूक शाखेत कार्यरत असताना लाच स्वीकारल्याप्रकरणी निलंबित झालेला होता. त्यानंतर तो सेवेत पूर्ववत झाला होता.
अनैतिक संबंधातून खुनाची चर्चा
पोलिसानेच पोलिसाचा खून केल्याची माहिती वा-यासारखी शहरात पसरल्याने काही मिनिटांतच रुग्णालयात पोलिस अधिकारी, कर्मचा-यांनी मोठी गर्दी केली. खुनाचा हा प्रकार अनैतिक संबंधातूनच झाल्याची चर्चा त्यांच्यात सुरू होती. यापूर्वीही त्या दोघांत बाचाबाची झाली होती. मात्र, या प्रकाराबाबत स्पष्टपणे कोणीही बोलत नव्हते. पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी तपासादरम्यान या सर्व बाबी स्पष्ट होतील, असे सांगितले.
पोलिसांनीही सोडवले नाही भांडण!
दर्गा रस्त्यावरील हनुमान चौकात भरदुपारी खुनाचा हा थरार सुरू असताना बंदोबस्तावरील पोलिस कर्मचा-यांनी त्यात हस्तक्षेप केला नाही. काही कर्मचा-यांनी तर घटनास्थळावरून पोबारा करणेच पसंत केले.