आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाचप्रकरणी लिपिकास एक वर्षाची सक्तमजुरी, जिल्हाधिकाऱ्यांनी केले सेवेतून बडतर्फ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- भूसंपादन प्रमाणपत्र मिळण्याबाबतच्या अर्जावर शेरा लिहून सही करून उपजिल्हाधिकाऱ्यांच्या समोर ठेवण्यासाठी २०० रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या याच कार्यालयातील लिपिकाविरुद्ध न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला आहे. यामुळे न्यायालयाने सदर लिपिकास एक वर्षाची सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, जिल्हाधिकारी नायक यांनी या लिपिकास
शासकीय सेवेतून बडतर्फ केले आहे. किसन परसराम फलके असे लिपिकाचे नाव आहे.

९ ऑगस्ट २०११ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील भूसंपादन विभागात ही घटना घडली होती. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

यात गुन्ह्याचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात सुनावणीअंती फलकेविरुद्ध गुन्हा सिद्ध झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस निरीक्षक आर. डी. निकाळजे यांच्या नेतृत्वाखाली हा सापळा रचण्यात आला होता.